मणिपूरमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल. संसदेबरोबरच संपुर्ण ‘देश तुमच्यासोबत असून सर्वजण मिळून या आव्हानाचे निराकरण करण्यासाठी मार्ग शोधू तसेच लवकरच मणिपूरच्या राज्य पुन्हा प्रगतीचा साक्षीदार होणार असल्याचा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना केले. दी सरकार विरुद्ध विरुद्ध विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी आज भाष्य केले.
पंतप्रधान मोदींनी सरकारवर विश्वास दाखविल्याबद्दल देशातील जनतेचे आभार मानून भाषणाला सुरुवात केली आणि म्हणाले, “अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी नेहमीच भाग्यवान ठरला असून यामुळे आम्ही रेकॉर्डब्रेक जनादेश घेऊनच परत येऊ अशी खात्री देतो.”
आपल्या भाषणात, कॉंग्रेसप्रणित विरोधी गट भारताच्या विश्वासार्हतेवर हल्ला चढवत असल्याचा दावा करताना पंतप्रधान म्हणाले, “सर्व विरोधकांना जिवंत राहण्यासाठी ‘एनडीए’ची गरज आहे. त्यांनी फक्त आपल्या नावापुढे दोन ‘आय’ जोडले आहेत. काँग्रेसचे स्वतःचे असे काहीही नसून त्यांच्या मतदान चिन्हापासून ते राजकिय कल्पनांपर्यंत सर्व गोष्टी दुसऱ्याकडूनच घेतल्या गेल्या आहेत.” असा दावा पंतप्रधानांनी केला.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर उपहासात्म भाष्य़ करताना, पंतप्रधानांनी रावणाच्या अहंकाराने लंका जळाल्याचे खरे असले तरी काँग्रेसहीला ही याच अहंकाराने ग्रासले असल्याचे ते म्हणाले.
अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत विरोधक तयारीने का येत नाहीत, असा सवाल करताना “मी तुम्हाला 5 वर्षांचा वेळ दिला आहे. मी तुम्हाला 2018 मध्येच सांगितले होते की 2023 मध्ये तयार रहा,” असा टोला पंतप्रधान मोदी विरोधकांना लगावला. तसेच विरोधकांचा दृष्टिकोन शहामृगासारखा असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांची टिका हा देशाच्या विकासातील ‘काळ्या टिपक्या’सारखा असल्याचे म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, “मोदी तेरी कबर खुदेगी ही विरोधकांची आवडती घोषणा आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी डिक्शनरीतून शोधून शोधून माझ्यावर शिवीगाळ केली. पण मी तुम्हाला एक गुपित सांगेन. मी त्याच शिव्यांचं टॉनिक बनवलंय,”
विरोधकांच्या नविन नावाचा उपहास करताना ते म्हणाले, “नविन आघाडी ‘इंडिया आघाडी’ नसून घमंडिया आघाडी आहे. या आघाडीमध्ये प्रत्येकजण पंतप्रधान बनण्याची इच्छा बाळगून आहे. ते प्रत्येक राज्यात विरोधात आहेत. प.बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेससोबत तसेच कम्युनिस्टांच्या विरोधात आहेत पण दिल्लीत ते एकत्र आले आहेत.”असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.