फांदीवर बसताच घेतो जीव
बहुतांश वृक्ष हे पक्ष्यांसाठी अत्यंत वरदायी ठरत असतात. वृक्षांना लागलेली फळे आणि रस यांचे ग्रहण करत पक्षी आणि अनेक किटक जगत असतात. याचमुळे अनेक पक्षी वृक्षांकडे आकर्षित होत असतात. परंतु पृथ्वीवर एक असा वृक्ष आहे, जो पक्ष्यांचा जीव घेत असतो. हा वृक्ष स्वत:च्या फांद्यांवर घरटी निर्माण करण्यासाठी छोट्या पक्ष्यांना आकर्षित करतो आणि पक्षी फांदीवर बसताच त्याचे बीज पक्ष्यांच्या पंखांना चिकटतात. यामुळे या पक्ष्यांचे वजन वाढते आणि काही वेळताच ते जमिनीवर कोसळतात आणि भूकेने मरून जातात. मग या पक्ष्यांना शिकाऱ्यांकडून फस्त केले जाते. याचमुळे या वृक्षांना पक्ष्यांचा मारेकरी देखील म्हटले जाते.
पक्ष्यांना मारण्यासाठी पूर्ण जगात बदनाम या वृक्षाचे नाव पिसोनिया प्लांट आहे. तसेच त्याला बर्ड कॅचर देखील म्हटले जाते. या पक्ष्याचे बीज अत्यंत लांब असतात, त्यावर एक द्रव्य असते, जे अत्यंत चिकटणारे आहेत. तसेच त्यात एक छोटासा हुक असतो, जो कुठल्याही गोष्टीला सहजपणे चिकटून जातो. याचे बीज अत्यंत गुंतलेल्या गुच्छांमध्ये उगतात. प्रत्येक गुच्छात 12 पासून 200 हून अधिक बीज असू शकतात. जेव्हा एखादा पक्षी या वृक्षाच्या फांद्यांवर बसतो, तेव्हा हा वृक्ष स्वत:चे बीज फैलावण्याच्या नादात या पक्ष्याच्या पंखाला चिकटवितात, नंतर याचमुळे या पक्ष्याचा मृत्यू होतो.
सागरी पक्ष्यांसाठी घातक
पिसोनिया वृक्षात वर्षाकाठी दोनवेळा फूल येत असते. सर्वसाधारणपणे कॅरेबियन बेटांवर दिसून येणारे हे वृक्ष सागरी पक्ष्यांसाठी घात असते. सागरी पक्षी घरटी निर्माण करण्यासाठी पिसोनियाची निवड करतात, त्यांच्या अंड्यांमधून पिल्लू बाहेर पडल्यावर ते गुच्छात चिकटून अडकून पडतात. मूठभर बीज देखील त्यांच्यासाठी घातक असते, यामुळे त्यांना उडणे शक्य होत नाही आणि ते खाली कोसळतात.
प्रत्येक वृक्षावर दिसतात पक्षी
अनेकदा या वृक्षांवरच पक्षी मरून जातात. त्यांचे अवशेष फांद्यांवर लटकलेले दिसून येतात. अत्यंत धोकादायक असूनही अनेक सागरी पक्षी पिसोनियाच्या वृक्षांनाच पसंत करतात. त्याच्यावरच स्वत:चे घरटे निर्माण करतात. सागरी पक्षी नसलेला पिसोनिया वृक्ष पाहणे अत्यंत दुर्लभ असल्याचे युएस फिश अँड वाईल्डलाइफ सर्व्हिसचे वन्यजीव तज्ञ बेथ फ्लिंट यांनी सांगितले आहे