त्यावरून उडी घेतल्यास 26 सेकंदांपर्यंत हवेत तरंगणार
जगात एक असा पर्वत आहे, जेथून कुणी खाली पडल्यास तो 26 सेकंदापर्यंत हवेतच राहणार आहे. या पर्वताचे नाव माउंट थॉर आहे. माउंट थॉर कॅनडाच्या उत्तर भागात असून हा पर्वत बार्फिन बेटावर आहे. पॅनडाच्या आर्क्टिक बेटसमुहांपैकी हे सर्वात मोठे बेट आहे. या पर्वताचे नाव नॉर्स पौराणिक कथेतील एक देवता ‘थॉर’च्या नावावर ठेवण्यात आले आहे. ही देवता वीज आणि गडगडाटाची देवता मानली जाते. हे नाव या पर्वताविषयीची भीती आणि शक्ती व्यक्त करते.
सर्वात धोकादायक
माउंट थॉरची उंची जवळपास 5500 फूट आहे, परंतु हा केवळ उंचीमुळे प्रसिद्ध नसून याच्या एका बाजूकडील खडक याच्या प्रसिद्धीचे कारण आहे, याला वेस्ट फेस म्हटले जाते. हा खडक मागील बाजूने वळलेला आहे. जर या खडकावरून कुठलीही गोष्ट कोसळली तर तो 4100 फुटांपर्यंत कुठल्याही अडथळ्याशिवाय थेट खाली येईल. परंतु माणूस विनापॅराशूट येथून उडी मारत असल्यास तो 26 सेकंदांपर्यंत तरंगत राहणार आहे, निम्म्या मिनिटापर्यंत तळाला धडकणार नाही.
उलट्या बाजूने झुकलेले
माउंट थॉरच्या वेस्ट फेस 105 अंशांनी झुकलेला आहे, सर्वसाधारणपणे कुठलीही भिंत 90 अंशाची असते, परंतु ही त्याहून अधिक झुकलेली आहे, म्हणजेच मागील बाजूला झुकलेली आहे. याला ओवरहँग म्हटले जाते, यामुळे हा खडक थेट भिंतीप्रमाणे नव्हे तर वरून काहीसा बाहेरच्या बाजूने निघालेला दिसतो.
कोट्यावधी वर्षे जुना पर्वत
माउंट थॉरचा इतिहास अत्यंत जुना आहे. हा पूर्ण पर्वत ठोस ग्रेनाइटने निर्मित आहे. वैज्ञानिकांनुसार हा ग्रॅनाइट सुमारे 3.5 अब्ज वर्षांपासून 57 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला होता. याच खडकाचे धोकादायक वेस्ट फेस हे हळूहळू तयार झाले आहे. हजारो वर्षांपर्यत ग्लेशियर म्हणजेच बर्फाचे पर्वत या भागात येत-जात राहिले, जेव्हा हे हिमपर्वत पुढे यायचे आणि मागे हटायचे, तेव्हा ते या खडकाला कापत केले. हा प्रकार हजारो वर्षांपर्यंत होत राहिला, त्याचमुळे या खडकाचा सी सारखा आकार होत गेला.
अॅडव्हेंचरस ठिकाण
माउंट थॉर कॅनडाच्या अत्यंत दुर्गम आणि थंड भागात आहे. तेथे पोहोचणे सोपे नाही, तरीही हा पर्वत रॉक क्लायम्बिंग करणाऱ्या लोकांदरम्यान प्रसिद्ध आहे. या पर्वताला प्रथम 1965 मध्ये सर करण्यात आले होते. अमेरिकेचे एक वैज्ञानिक आणि गिर्यारोहक लायमन स्पिट्जर आणि त्यांचे सहकारी डोनाल्ड मॉर्टन यांनी मिळून हा पर्वत सर केला होता. परंतु याचे सर्वात धोकादायक ठिकाण वेस्ट फेसवर चढाई करण्याचा प्रयत्न 1985 मध्ये झाला. याकरता त्यावेळी 33 दिवस लागले होते.
माउंट थॉर खास का
माउंट थॉर हा स्वत:च्या उंचीपेक्षा आकारासाठी ओळखला जातो. निसर्ग किती अजब आणि अनोख्या गोष्टी निर्माण करू शकतो हे यातून समोर येते. हा पर्वत सरळ नव्हे तर उलट्या बाजूने झुकलेला आहे.









