अमेरिकेच्या न्यू मेक्सिकोत लागला शोध
अमेरिकेतील न्यू मेक्सिको प्रांतात सर्वात जुन्या मानवी पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. तेथील व्हाइट सँड्स नॅशनल पार्कमध्ये हा नवा शोध लागला आहे. आढळून आलेल्या पाऊलखुणा 23000 वर्षे जुन्या असल्याचे एका अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. या पाऊलखुणा उत्तम अमेरिकेत लोकांकडून सोडण्यात आलेला सर्वात जुना जीवाश्म ट्रॅकवे तयार करतात. परंतु प्रत्येकजण या अध्ययनाच्या निष्कर्षांवर सहमत नाही.

या मानवी पाऊलखुणांचा काळ जाणून घेण्यासठी दोन डेटिंग टेक्निक्सचा वापर करण्यात आला. ट्रॅकवे 23 हजार वर्षे जुना असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. याचा अर्थ या पाऊलखुणा हिमयुगातील सर्वात थंड हिस्स ‘लास्ट ग्लेशियल मॅक्सिमम’च्या काळाच्या आसपासच्या आहेत.
क्लोविस लोक उत्तर अमेरिकेत सुमारे 13 हजार वर्षांपूर्वी येणारे पहिले मानव होते असा तर्क पुरातत्वतज्ञांचा यापूर्वी होता. मागील काही दशकांमध्ये पुरातत्वतज्ञांनी प्री-क्लोविस किंवा 13 हजार वर्षांपूर्वी अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविषयी ठोस पुरावे शोधले आहेत, परंतु त्या शोधण्यात आलेल्या स्थळांपैकी अनेक पुरावे ठोस नव्हते किंवा ते क्लोविसपेक्षा केवळ काही हजार वर्षे जुने होते.
व्हाइट सँड्स ट्रॅकवे आता उत्तर अमेरिकेत मनुष्यांचा प्रत्यक्ष पुरावा असलेले जुने स्थळ आहे. तसेच हे पहिल्या अमेरिकनांच्या आगमनाची तारीख मागे ढकलणारा पुरावा आहे. कॅथलीन स्प्रिंगरसोबत अध्ययनाचे सह-नेतृत्व करणारे जेफरी पिगाती यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. आमच्याकडे आता लास्ट ग्लेशियल मॅक्सिममदरम्यान येथे लोकांचे वास्तव्य होते याचे ठोस पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









