12 हजार वर्षांपूर्वी हाडांद्वारे निर्मिती
बासुरीचा उल्लेख झाल्यास भगवान श्रीकृष्णांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे, परंतु इस्रायलच्या पुरातत्व तज्ञांना आता एक अशी बासुरी मिळाली आहे, जी 12 हजार वर्षे जुनी आहे. याला जगातील सर्वात जुनी बासुरी देखील म्हटले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तेथे एक किंवा दोन नव्हे तर बासुरींच पूर्ण सेटच सापडला आहे.

इस्रायलमध्ये आयनन ऐन मल्लाह नावाची जागा असून तेथे मागील 30 वर्षांपासून उत्खनन सुरू आहे. या ठिकाणाला ऐन मल्लाह नावाने देखील ओळखले जाते. प्राचीन काळा येथे नाटुफियन वस्ती होती असे बोलले जाते. या नाटुफियनना शिकारी देखील मानले जाते. 1950 च्या दशकात या ठिकाणाचा शोध लागला होता, परंतु कित्येक वर्षांपर्यंत येथे गांभीर्याने संशोधन करण्यात आले नव्हते. मागील वर्षी पुरातत्व तज्ञांनी येथे 1100 पक्ष्यांच्या हाडांदरम्यान ही बासुरी दिसून आली होती. सागरी पक्ष्यांच्या हाडांचा वापर करत त्यांची निर्मिती करण्यात आली होती. यातील केवळ एक बासुरीच पूर्णपणे तयार करण्यात आली होती. याची लांबी 2.6 इंच इतकी होती.
सर्वात छोट्या ध्वनी उपकरणांपैकी एक
सायंटिफिक रिपोर्ट्स नियतकालिकात यासंबंधी 9 जून रोजी अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधनाचे लेखक आणि जेरूसलेममध्ये प्रेंच रिसर्च सेंटरमधील पुरातत्वाचे पोस्टडॉक्टोरल फेलो लॉरेंट डेविन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. ही बासुरी प्रागैतिहासिक काळापासून आतापर्यंत ज्ञात सर्वात छोट्या ध्वनी उपकरणांपैकी एक आहे. या बासुरीचा रंग लाल असून संबंधित काळात याला एका तारेने बांधून ठेवले जात असावे. या बासरीचे वादन केले असता यूरेशियन स्पॅरोहॉक्स आणि कॉमन केस्ट्रेलसारखा आवाज आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पक्ष्यांशी संवाद
नाटुफियन्स लोकांनी गरुडाच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी या छोट्या हाडांची निवड केली असावी. यातून नाटुफियन्स लोकांना आवाजाबद्दल असले ज्ञान दिसून येते. गरुडाला बोलाण्यासाठी मोठा आवाज काढणे आवश्यक असल्याचे त्यांना माहित असावे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर करून आम्ही याची प्रतिकृती तयार केली आहे. नॅचुफियन्सनी शिकार करताना किंवा पक्ष्यांसाब्sात संवाद साधण्यासाठी या बासरीचा वापर केला असावा असे डेविन यांनी म्हटले आहे.









