23 वर्षीय स्पाइकच्या नावावर विक्रम
अमेरिकेच्या ओहायोमध्ये राहणाऱया एका कुटुंबाने स्वतःच्या श्वानाचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदविले आहे. या श्वानाचे नाव स्पाइक असून तो चिहुआहुआ प्रजातीचा आहे. स्पाइक ओहायोतील कॅमेडेन गावात किम्बाल कुटुंबासोबत राहतो. 7 डिसेंबर रोजी स्पाइकचे वय 23 वर्षे आणि 43 दिवसांचे झाले असल्याचे गिनिज बुकचे म्हणणे आहे. 9 इंच उंचीच्या स्पाइकचे वजन 5.85 किलोग्रॅम आहे.

पार्किंगमध्ये मिळाला होता स्पाइक
स्पाइक हा श्वान मला एका पार्किंगमध्ये आढळून आला होता. मी घरगुती सामग्री घेऊन परतत असताना स्पाइक पार्किंगमये होता. त्यावेळी स्पाइक 10 वर्षांचा होता. स्पाइकला घरी आणण्याचा निर्णय मी घेतला होता असे त्याला सांभाळणाऱया रीटा किम्बाल यांनी सांगितले.
स्पाइकच्या पाठीला ईजा झाली होती, तो अत्यंत वाईट अवस्थेत होता. मागील तीन दिवसांपासून तो पार्किंगमध्ये असल्याचे स्थानिक दुकानदाराने सांगितले होते. दुकानदाराकडून त्याला अन्न दिले जात होते. रीटा स्टोअरमधून निघाल्यावर स्पाइक तिच्या मागून जात होता. रीटा यांनी स्वतःच्या नातवासाठी कारचा दरवाजा उघडल्यावर स्पाइक आत शिरला. यानंतर स्पाइकला घरी आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
श्रवण अन् दृष्टीक्षमता दुर्बल स्पाइक एक शांत आणि अत्यंत प्रेमळ श्वान आहे, कुणी त्याला स्पर्श केला तरच तो आक्रमक होतो. परंतु स्पाइकला नीट दिसत नाही तसेच त्याला ऐकू देखील फारसे येत नसल्याचे रीटा यांनी सांगितले आहे.









