भाजपचे 2024 च्या निवडणुकीसाठी विचारमंथन : युवा नेतृत्त्वाला संधी देण्याचा विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाने अनेक नवीन योजना आखल्या आहेत. पक्षाच्या विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यापासून ते नव्या चेहऱ्यांना संधी देण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठी विचार करत आहेत. तऊण आणि युवा नेतृत्त्वाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी भाजप संसदेतील जागांचे वयानुसार वाटप करत आहे. येत्या निवडणुकीत विद्यमान खासदारांना पक्षसंघटनेत सामावून घेतानाच नवोदितांना संधी दिली जाणार आहे. त्यादृष्टीने पक्षश्रेष्ठी जवळपास 150 नवीन उमेदवार रिंगणार उतरवू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
पुढील वषी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी जोरात सुरू केली आहे. विरोधी एकजुटीच्या शक्मयतांदरम्यान, भाजप देशभरातील आपल्या विद्यमान खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आणि पुन्हा निवडणूक जिंकू शकणाऱ्या खासदारांची यादी अंतिम करण्यात व्यस्त आहे. यापूर्वी लोकसभेतील 26 टक्के सदस्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते, पण संसदेत आल्यानंतर हे वय कमी झाले आहे. यासोबतच तीन ते अकरा वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांची संख्याही वाढत असल्यामुळे भाजप त्यांच्यावर अधिक संघटनात्मक जबाबदारी सोपवू पाहत आहे. तसेच, अपवाद वगळता कोणत्याही सदस्याला दोनपेक्षा जास्तवेळा राज्यसभेवर न पाठवण्याचाही विचार आहे. तसेच कायदा, वैद्यक, विज्ञान, कला, आर्थिक घडामोडी, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि भाषा अशा विविध क्षेत्रातील तज्ञांना सामावून घेतले जाणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. सध्या लोकसभेत भाजपचे 301 खासदार आहेत. परंतु यापैकी 65 हून अधिक खासदारांचा कार्यअहवाल असमाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत सत्ताविरोध टाळण्यासाठी भाजप या जागांवर उमेदवार बदलण्याचा म्हणजेच विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. यापैकी काही खासदारांचा संसदीय मतदारसंघही बदलला जाऊ शकतो.
मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने यावषी 30 मे ते 30 जून या कालावधीत देशभरात विशेष जनसंपर्क मोहीम राबवली होती. या कार्यक्रमात पक्षाचे अनेक खासदार आपला प्रभाव सिद्ध करू न शकल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष न•ा यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत संबंधितांना फटकारले होते. तसेच आपला दृष्टिकोन बदला किंवा बदलाला तयार राहा, असा सूचक इशाराही देण्यात आला होता.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी काही खासदारांचे तिकीट वयाच्या कारणामुळे कापले जात असले तरी बहुतांश खासदार असे आहेत जे आपापल्या मतदारसंघात सक्रिय नव्हते. 2014 आणि 2019 मध्ये एकाच जागेवरून सलग दोनदा निवडणूक जिंकलेल्या अशा खासदारांवरही पक्षाची नजर आहे. यातील अनेक खासदारांनी पक्षश्रेष्ठींची वृत्ती लक्षात घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संपर्काचा वापर करून तिकीट वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.









