प्रतिनिधी / बेळगाव : पंधरा दिवसा पासून पाणी पुरवठा करण्यात आला नसल्याने एलऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले. आम्ही पाणी पुरवठा केला असून पाणी कुठे गेले आम्हाला माहीत नाही असे थातूर-मातूर उत्तर देऊन बेजबाबदारपणा दाखविला . त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.यापुढे व्यवस्थित पाणी पुरवठा केला जाईल असे सांगण्यात आले.
पाणी पुरवठा नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि एलअँडटी अधिकाऱ्यासह नागरिकाचा व्हॅटसुप ग्रुप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.









