सावंतवाडी : प्रतिनिधी
माठेवाडा मदारी रोड येथील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी शहरातील विविध समस्यांबाबत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे लक्ष वेधले आहे.माठेवाडा मदारी रोड हा भरवस्तीचा शहरी भाग आहे. या भागातील रस्त्यांवर भरपूर नागरीकांची वर्दळ असते. तसेच तेथे एक प्रसुती रुग्णालय असल्याने तेथून रुग्णांच्या नातेवाईकांची ये जा होत असते. या भागातील गटार शेजारील रस्ता खाचलेला असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गटारात अडकलेला कचरा न काढल्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्याचप्रमाणे रस्त्या बाजूची झाडी वाढल्याने वाहन चलविण्यास व नागरीकांची पायी जाण्यास त्रास होत आहे. वारंवार नगरपरिषदेला कल्पना देवूनही त्यावर उपाय योजना होत नसल्याचे दिसते. त्याचप्रमाणे उपरकर शूटिंग रेन्जकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याचे स्लॅब कोसळलेले आहे. पुढील महिन्यात गणेश चतुर्थीचा उत्सव असल्याने या रस्त्यावरुन श्री गणेश मुर्ती रहिवास्यांना ने आण करण्यासाठी सोयिस्कर होण्यासाठी आपण लवकरात लवकर कोसळलेला स्लॅब घालून घ्यावा. यापुर्वी आपणाकडेन या भागाची पहाणी झालेली आहे. तरीसुध्दा यावर कोणत्याही प्रकारे लक्ष देण्यात आले नाही., या माठेवाडा मदारी रोड वरील समस्यांकडे तातडीने लक्ष घालून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर ,बावतीस फर्नांडिस, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, मारिता फर्नांडिस ,अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष एडवोकेट सौ राबिया शेख-आगा, तौसीफ आगा उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









