जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाभरात रत्नागिरी दौऱ्यावर : पंतपधान सडक, मुख्यमंत्री ग्रामसडकच्या कामांना मिळणार गती : 2019 पासून रखडलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडकच्या 251 कि.मी. कामांना मंजुरी : पंतपधान सडकच्या 265 कि.मी.ला 6 दिवसात मिळणार मंजुरी
प्रतिनिधी/रत्नागिरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिनाभरात रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याहस्ते येथील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे उद्घाटन होणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका व ग्रंथालय इमारत आणि इंजिनिअरींग कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्याहस्ते होणार आहे. अन्य कार्यक्रमही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतपधान सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रत्नागिरी जिल्ह्dयातील रखडलेल्या कामांना गती देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची 2019 पासून रखडलेल्या जिह्यातील 251 कि.मी. रस्त्यांच्या 207 कोटीला मंजुरी देण्यात आली आहे. तर पंतप्रधान सडक योजनेतील 265 किलोमीटरसाठी 200 कोटीला मंजुरी येत्या 6 दिवसात मिळणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शासनाच्या या निर्णयामुळे जिह्यात जवळपास सव्वाचारशे किलोमीटर चारशे कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याचे सामंत यांनी आŸनलाईन घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे जिल्ह्dयातील रस्ते विकासाला गती मिळण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिह्यात 2019 पासून मुख्यमंत्री सडक योजनेची कामे रखडली होती. त्या कामांना मंजुरी देण्यात आल्याने रत्नागिरीसह राज्यभरातील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाला गती मिळणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचा आराखडा तयार आहे. त्यातूनच ही कामे घेतली जाणार आहेत. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर वर्षभरात ही कामे केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी जिह्यासाठी 251 कि.मी.च्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यात मंडणगडमध्ये 12.5 किमीसाठी 9 कोटी, दापोलीत 26.25 किमीसाठी 10.50 कोटी, खेडमध्ये 29.63 किमीसाठी 19.50 कोटी, गुहागरमध्ये 21.84 किमीसाठी 16.50 कोटी, चिपळूण तालुक्यात 31.14 किमीसाठी 23.25 कोटी, संगमेश्वरमध्ये 37.24 किमीसाठी 25 कोटी, रत्नागिरी तालुक्यात 33.19 किमीसाठी 25 कोटी, लांजा तालुक्यात 25.51 किमीसाठी 18 कोटी व राजापूरसाठी 35.16 किमीसाठी 26.25 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेबाबतही जिल्हा पातळीवर 16 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. या योजनेबाबत कमिट्याही मागील अडीच वर्षात झाल्या नव्हत्या. त्या बाबतही चर्चा होणार आहे. पंतप्रधान सडक योजनेच्या 265 किमी रस्त्याला या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. जिह्यातील 100 किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी मिळेल, असेही सामंत यांनी सांगितले. त्यासाठी 200 कोटी रुपयांची मंजुरी मिळेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
वर्षभरात 25 हजार उद्योजक तयार करणार
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या वर्षभरात 25 हजार उद्योजक तयार करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. नवीन उद्योग निर्मिती करताना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज प्रक्रियेत अडचणी येतात. त्यामुळे महाराष्ट्रातील 14 सहकारी बँकांचा या योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. यात रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कोल्हापूर, सातारा यासह एकूण 14 मध्यवर्ती बँकांचा समावेश आहे. 10 ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय जास्तीत-जास्त प्रकल्प कोकणात यावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले.