दक्षिण-उत्तर मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांत 9924 मतदारांची नोंद
प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने जोरदार तयारी चालविली आहे. यापूर्वी तात्कालिक मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. गुऊवारी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात 4 लाख 84 हजार 549 मतदार आहेत. अंतिम मतदारयादीत 9 हजार 924 मतदारांची नोंद झाली आहे.
यापूर्वी दि. 9 नोव्हेंबर 2022 रोजी दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची कच्ची मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. गुऊवारी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, महापालिका कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करून मतदारयादीबाबत माहिती देण्यात आली. महापालिका आयुक्त ऊद्रेश घाळी, सामान्य प्रशासन उपायुक्त आणि महापालिका निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील मतदारांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता मतदारयादीत नावनेंदणीचे काम सुरू राहणार आहे. तसेच नवीन नाव दाखल करणे, मतदारांच्या नावातील चुकीची दुऊस्ती आणि मृत मतदारांचे नाव कमी करणे, आदी काम सुरू राहणार आहे, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.
दक्षिण मतदारसंघात दि. 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत 2 लाख 36 हजार 587 मतदार आणि उत्तर विभागात 2 लाख 38 हजार 038 मतदारांची नोंद झाली होती. त्यानंतर अंतिम मतदारयादी करण्यापूर्वी नावनोंदणीचे आवाहन करण्यात आल्यानंतर यामध्ये 9 हजार 924 मतदारांची वाढ झाली आहे. दोन्ही मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील मतदारांनी मतदारयादीत नव्याने नावे दाखल केली आहेत. त्यामुळे दक्षिण मतदारसंघातील मतदारांची संख्या 2 लाख 40 हजार 70 आणि उत्तर मतदारसंघातील मतदारांची संख्या 2 लाख 43 हजार 842 इतकी झाली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील मतदारांची संख्या 4 लाख 84 हजार 549 झाली आहे.
त्याचप्रमाणे नव्याने मतदारयादीत दाखल झालेली नावे, चुकीची दुऊस्ती आदीकरिता अर्ज केलेल्या मतदारांनाही नवीन ओळखपत्र देण्यात येणार आहे. ही ओळखपत्रे लवकरच बीएलओकडे सुपूर्द केली जाणार आहेत. मतदारांच्या घरी जाऊन किंवा संबंधित शाळेत ओळखपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
नवोदित मतदारांचा शोध घेण्याची सूचना
अंतिम मतदारयादी प्रसिद्धीनंतरही महसूल निरीक्षकांची बैठक
महापालिका व्याप्तीमधील दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांची अंतिम मतदारयादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र अद्यापही नवोदित मतदारांची नावे राहिल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक घरोघरी जावून नवोदित मतदारांचा शोध घेऊन मतदारयादीत नावे नोंदविण्याची सूचना मनपाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.
निवडणूक विभागाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली असली तरी याबाबत समाधान नाही. शहरातील नवोदित मतदारांच्या नावाची नोंद झाली नसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक मतदाराच्या नावाची नोंद यादीत करण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या महसूल अधिकाऱ्यांची बैठक महापालिका कार्यालयात घेण्यात आली. तसेच प्रत्येक घरोघरी जावून मतदारांची माहिती घ्या, बीएलओंच्या सहकार्याने नवोदित मतदारांची नावे मतदारयादीत नोंद करण्याची सूचना महसूल निरीक्षकांना करण्यात आली.
सध्या मतदारयादीत नावनोंदणी करण्याकडे नवोदित मतदारांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्व मतदारांची नावे यादीत समाविष्ठ करण्याच्यादृष्टीने मोहीम राबविण्याची सूचना करण्यात आली. महापालिकेच्या महसूल अधिकाऱ्यांसह बीएलओंनी नवीन मतदारांचा शोध घेऊन मतदारयादीत नाव दाखल करणे बंधनकारक आहे. महापालिकेचे महसूल अधिकारी सध्या याच कामात गुंतले आहेत. अन्य कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. तरीदेखील मतदारयादीबाबत निवडणूक आयोग समाधानी नाही. त्यामुळेच अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदारांची माहिती घेण्याची सूचना मनपाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.









