The number of thieves is increasing only because the police are not patrolling – former taluk president of MNS Gurudas Gawande
इन्सुलि, रोनापाल, मडुरा आधी परिसरात काल रात्री मंदिरे फोडून रोकड लंपास करायचा प्रयत्न केला. परंतु मंदिर प्रशासनाने ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावले आहेत म्हणून चोरट्यांचा शोध घेणे अवघड होणार नाही. आज बघायला गेलो तर बांदा परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक राहतात परंतु याची नोंद स्थानिक पोलीस प्रशासनाकडे नाही दोन दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरव कुमार अग्रवाल यांच्या आम्ही भेट घेतली होती आणि त्यांना विचारलं होतं की बांदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे का ते बोलले सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पोलीस कर्मचारी हे बांदा पोलीस स्थानकामध्ये आहेत त्यामुळे रात्रीची जर पोलिसांनी गस्त घातली तर मग असे प्रकार चोरांचे प्रकार वाढत चालले नसते. मटका, दारू, जुगार आधी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी हे निवडणुकी पुरते गावात भेटी देतात परंतु त्यांच्या पोलीस हद्दीमध्ये त्यांचा लक्ष नाही. काही पोलीस कर्मचारी चेक पोस्टवर मोबाईलवर खेळत असतात त्यामुळे दोन दिवसापूर्वी कणकवलीत पकडलेली पोलिसांनी दारूची गाडी बांदा चेक पोस्टवरून सुटली कशी काय ? जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही विनंती केली आहे की बांदा पोलीस चेक पोस्ट या ठिकाणी असणारी सीसीटीव्ही यंत्रणा आहे ती अगोदर २४ तास चालू करा. आणि थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्याच्यावर नियंत्रण ठेवा. आज मंदिरा फोडली उद्या घरे फोडली जातील. प्रत्येक परप्रांतीय हे मोठ्या प्रमाणात गावात काही ना काही विकण्याच्या बहाण्याने गावात फिरत असतात . पोलीस यंत्रणा जर गावांमध्ये पोचत नसेल तर ग्रामपंचायती हद्दीतील प्रत्येक पोलीस पाटील यांची बैठक घेऊन तशा सक्त सूचना देण्यात याव्या. बांदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या गावांमध्ये बैठका लावाव्यात मोठ्या प्रमाणात शहरात भाडेतत्त्वावर राहणारे परप्रांतीय युपी, बिहार वरून येतात आणि या गावामध्ये जाऊन सकाळची पाहणी करतात आणि रात्री दरोडा टाकतात. एक गाव एक पोलीस ही यंत्रणा तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री दीक्षित कुमार गेडाम यांनी राबवली होती परंतु बघायला गेलो तर एकाही पोलीस कर्मचाऱ्यांनी गावामधल्या नोंदवहीमध्ये तशाबाबतच्या किती गावांना भेटी दिल्या. शेजारी गोवा राज्यात नवीन विमानतळ झाल्यामुळे बांदा चेक पोस्ट बॉर्डरवर सुरक्षेच्या कारणास्तव यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे अतिरिक्त फौज फाटा पोलिसांचा लावून या ठिकाणी यंत्रणा उभारा .जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ज्या तिन्ही गावच्या ठिकाणी मंदिर फोडली त्याची कसून चौकशी करावी व आरोपींना लवकरात लवकर जेल बंद करावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रमुख मागणी आहे. असे गुरुदास गवंडे आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
बांदा प्रतिनिधी









