The number of stray dogs increased in Arondya; Citizens’ demand for settlement
आरोंदामध्ये भटक्या कुत्र्याची संख्या वाढली आहे .भटकी कुत्री घोळका करून पुर्ण रस्त्यावर धावतात व वाहन चालकांच्या मागे धावतात . त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच बाजार पेठेत ही चालणाऱ्या माणसांच्या ही मागे लागतात. त्यात काही भटकी कुत्र्याना जखमा झाल्या आहेत . ती कुत्री पिसाळण्याची शक्यता नाकारता येत नाही . ही भटकी कुत्री पाळीव कोंबडी मांजरे खातात त्या मुळे संबंधीत खात्याने यात लवकरात लवकर लक्ष घालुन लवकरात लवकर अशा भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









