यंदा डझनभर कंपन्या येणार : रिटेलमध्ये भारताची आगेकुच
वृत्तसंस्था/ बेंगळूर
यंदाच्या वर्षी जागतिक कंपन्यांच्या ब्रँडेड स्टोअर्सची संख्या भारतातमध्ये वाढणार आहे. ही संख्या एकडझन इतकी असणार असल्याची माहिती समोर येत आहे. या स्टोअर्समध्ये फूड आणि बेव्हरेजेस कंपन्यांची संख्या अधिक असणार असल्याचे समजते.
मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी जागतिक कंपन्यांची ब्रँडेड स्टोअर्स सुरू करण्याची संख्या ही सरासरीपेक्षा दुप्पट असणार आहे. जगभरातील पाच आघाडीवरच्या ग्राहकोपयोगी वस्तुंवर खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत आघाडीवर असून भारतातील नागरिकांची वाढती क्रयशक्तीचा अंदाज बांधत जागतिक कंपन्या आता भारतामध्ये आपली स्टोअर्स सुरू करण्यासाठी धडपडत आहेत.
डनहिल, रॉबर्टो केवाली, लवाझा, अरमानी कॅफे, फूट लॉकर यासारख्या जागतिक ब्रँडची स्टोअर्स भारतामध्ये आगामी काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहेत. जागतिक कंपन्यांना भारतात येण्यासाठी रिलायन्स आणि आदित्य यासारख्या दोन दिग्गज कंपन्या मदत करत असल्याचेही समोर आले आहे. रिलायन्स ब्रँडस् आणि आदित्य बिर्ला फॅशन या कंपन्यांनी अनेक विदेशी ब्रँडसोबत भागीदारी केली आहे. रिलायन्सशी अलीकडच्या वर्षांमध्ये जवळपास 50 विदेशी ब्रँडस जोडले गेले आहेत.
भारतामध्ये जागतिक कंपन्या येण्यामागची पाच कारणे
47.3 कोटी ग्राहकांचा भारत हा विशाल देश.
या दशकामध्ये भारताची रिटेल इंडस्ट्री 9टक्केने विकसित होणार
पुढील तीन वर्षांमध्ये रिटेल इंडस्ट्रीची उलाढाल 11.62 लाख कोटीपर्यंत होणार
यावर्षी देशात 3.10 कोटी ग्राहण वाढण्याची शक्यता
रिटेलमध्ये गुंतवणुकीसाठी भारत सर्वाधिक आकर्षक देश ठरतोय