जूनमध्ये 44 लाख भारतीयांनी केला विदेशात प्रवास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या प्रभावात सुरु असणाऱया दोन वर्षांतील स्थितीमुळे समस्यांचा मारा झेलणाऱया हवाई वाहतूक उद्योग सर्वात वेगाने सुधारणा होत आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियम हटविल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत प्रवाशांची संख्या ही प्री कोविडच्या स्तरावर जवळपास 79 टक्क्यांच्या बरोबरीत आली आहे. देशातील प्रवासी संख्या ही प्री कोविडच्या दरम्यान 91 टक्क्यांच्या बरोबरीत राहिली आहे.
मार्च 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणावर प्रतिबंध लागू करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने 27 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील प्रतिबंध काढून टाकले आहेत. यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या वाढत राहिली आहे. जूनमध्ये 44 लाख प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवास केला असून मे महिन्याच्या तुलनेत संख्या 8 टक्के अधिक आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी इक्रा यांच्या एका अहवालामधून ही माहिती समोर आली आहे.
इक्राच्या माहितीनुसार देशांतर्गत प्रवाशांची कमी होण्याचे कारण म्हणजे उन्हाळय़ाची सुट्टी समाप्त होण्यासोबत व शाळाही सुरु झाल्याचे सांगितले जाते. यामुळे देशातील पर्यटनात घट झाली आहे. यामुळे इक्राच्या आंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात देशातील हवाई प्रवासाची संख्या ही प्री कोविडच्या वर पोहोचणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
खालील कारणांमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात तेजी
मोठय़ा आंतरराष्ट्रीय ठिकाणे खुली झाली आहेत, उदा ः थायलंड, व्हिएतनाम, दुबई
प्रवासातून प्रतिबंधामधून सवलत दिली आहे, व्हॅक्सीन्स जास्तीत जास्त ठिकाणी दिली आहेत.
दोन वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद, आता पुन्हा नव्याने लोक वेदेशाच्या प्रवासाकरीता बाहेर
विमान कंपन्यांनी वेगाने विमानांची संख्या वाढवल्याचाही परिणाम









