मुस्लीमांच्या संख्येत 12 टक्याने वाढ
पणजी : गोवा राज्यात ख्रिश्चन धर्मियांची संख्या कमी झाली तर मुस्लीम धर्मियांची संख्या वाढली आहे, अशी माहिती राज्यपाल पीएस श्रीधरन यांनी कोची ा केरळ येथील एका चर्चच्या कार्यक्रमात बोलताना दिली. गोवा राज्यात याआधी ख्रिश्चनधर्मीय 36 टक्के होते ते आता 25 टक्के झाले आहेत. मुस्लीमांची टक्केवारी वाढली असून ती 3 टक्क्यांवऊन 12 टक्के झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत गोव्यात उलट-सुलट चर्चा सुऊ असून समाजमाध्यमावर टीकाही होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा केला आहे.









