मुंबई:
भारतातील हवाई क्षेत्रातील कंपनी अकासाला प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम लाभत असून लवकरच कंपनीकडे विमानांची संख्या 30 वर पोहचणार आहे. यामहिन्यात कंपनीच्या ताफ्यात 28 वे विमान सामील होणार आहे.
2022 मध्ये सदरच्या कंपनीने विमान सेवा सुरु केली होती. गेल्या वर्षभराच्या काळात यांच्या प्रवासी संख्येत दुप्पटीने वाढ झाली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मार्च 2024 मध्ये 7.75 दशलक्ष इतकी असणारी विमान प्रवासी संख्या मार्च 2025 मध्ये 16 दशलक्ष इतकी झाली आहे. सध्याला प्रवासी असले तरी कंपनीच्या ताफ्यात पुरेशी विमाने नाहीत. त्यामुळे कंपनीच्या विकासावर त्याचा परिणाम होतो आहे. बोइंग यांच्याकडून विमानांची ऑर्डर मिळायला उशीर होताना दिसतो आहे.
किती दिलीय ऑर्डर
अकासाने यापूर्वीच एकंदर 226 विमानांची बोइंगकडे ऑर्डर नोंदवून ठेवली आहे. बोइंगला आजवर एकंदर 446 विमानांची ऑर्डर प्राप्त झाली असून फक्त 65 विमानांची पूर्तता करण्यात आली आहे. बोइंग यांनी येत्या काळात महिन्याला दोन विमानांची पूर्तता करण्याचे वचन दिले आहे.









