कोल्हापूर प्रतिनिधी
निर्भया पथकाची कारवाई सातत्याने सुरू आहे.दरम्यान आजही निर्भया पथकाने धडक कारवाई करत कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना हिसका दाखवला. विनाकारण कॉलेजच्या आवारात घुटमळणाऱ्या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने श्री मुखात लगावली. तसेच इतर तरुणांनाही काठीचाही प्रसाद देण्यात आला.अचानक झालेल्या कारवाईमुळे तरुणांची तारांबळ उडाली.शहरातील शाळा महाविद्यालयांच्या आवारात वाढलेल्या अवैध कृत्याच्या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाकडून ही धडक कारवाई होत आहे.









