दापोली / मनोज पवार :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व दापोलीत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या तालुक्यातील गोवा किल्ल्याचे संवर्धन शासनाकडून करण्यात येत आहे. मात्र मे महिन्यात झालेले बांधकाम जून महिन्यातच कोसळले आहे. सध्या येथे पर्यटकांचा वावर नसल्याने जीवितहानी टळली असली तरी कामाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय या प्रकाराबाबत शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील हर्णै बंदराजवळ 3 किल्ल्यांचा समूह आहे. कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला. हे किल्ले हर्णै समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणार्थ बांधले गेले, हे खात्रीशीर सांगितले जाते. त्यातील गोवा किल्ला हा सुमारे सव्वातीन हेक्टर जागेत पसरलेला आहे. हर्णै बंदराकडे जाताना रस्त्याला लागूनच किल्ल्याचे एक प्रवेशद्वार आहे. परंतु ते मुख्य प्रवेशद्वार नाही. मुख्य प्रवेशद्वार मागील बाजूने समुद्राकडे आहे. त्या समुद्राभिमुख दरवाजाच्या दोन्ही बाजूस आणि चौथऱ्याच्या तळाशी काही वैशिष्ट्यापूर्ण शिल्प कोरलेली आहेत. महाद्वाराच्या आतील बाजूस देवड्या व तटबंदी आहे. या तटबंदीवर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याचा पश्चिम आणि उत्तर भाग समुद्राने वेढलेला आहे.
- मे महिन्यात सुरू झाले होते काम
अनेक दशके समुद्राच्या लाटांचा मारा खाणारा व खाऱ्या हवेतही तग धरून उभा असणारा किल्ला कालानुरूप जीर्ण झाला. त्याची तटबंदी व एक-एक बुरूज ढासळायला लागले. याबाबत ‘तऊण भारत संवाद’ने नेहमी आवाज उठवला होता. शासनाच्या गडकिल्ले संवर्धन योजनेमध्ये या किल्ल्याच्या जतनाचे काम हाती घेण्यात आले. मे महिन्यापर्यंत या किल्ल्याच्या डागडुजीचे काम सुरू होते. यासाठी मोठ्या काळ्या दगडांचा वापर करण्यात आला. यामुळे या किल्ल्याला नवीन रुपडे प्राप्त होत होते. मात्र मे महिन्यात झालेले हे काम जून महिन्यात आलेल्या जोरदार पावसाने कोसळले आहे.
- पावसाळा आल्याने वावर नाही
सध्या पावसाळा असल्यामुळे किल्ल्यात पर्यटकांचा वावर नाही. पर्यटक जेव्हा गोवा किल्ला पहायला येतात, तेव्हा याच सर्व बुऊजावरून फिरून किल्ला पाहतात. जर पर्यटक किल्ला पाहत असताना हा बुऊज कोसळला असता तर मोठी जीवितहानी घडली असती. मात्र सुदैवाने ती टळली आहे. असे असले तरी या कामाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या किल्ल्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. तरीही भविष्यात होणारे काम अधिक गुणवत्तापूर्वक होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
- ‘संवर्धन’चा हेतू चांगला पण..
गोवा किल्ला संवर्धन योजनेत किल्ल्यांच्या परिसराची स्वच्छता तसेच डागडुजी व दुऊस्तीचाही समावेश आहे. यात किल्ल्यांच्या भिंती, बुऊज आणि इतर भागांची दुऊस्ती करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांचे मूळ स्वरुप टिकून राहील आणि भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल. किल्ल्यांवर पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, माहितीफलक आणि विश्रांतीसाठी जागा इत्यादी गोष्टींचीही निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच किल्ल्यांच्या परिसरात झाडे व वनस्पतींची लागवडही करण्यात येणार आहे.ज्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढेल व पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. किल्ल्यांच्या संवर्धन व पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. मात्र अनेक वर्ष टिकण्यासाठी करण्यात आलेले बांधकाम 2 महिन्यातच कोसळल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
- हिंदी सक्तीपेक्षा किल्ल्यांकडे लक्ष द्यावे
सरकारने मराठी जनांवर हिंदी सक्ती, जाती-जातीत विभाजन करण्याकडे लक्ष देण्यापेक्षा समस्त देशाचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे लक्ष द्यावे. आम्हा मराठी मनांचे हेच खरे प्रेरणास्थान असल्याचे दापोलीतील सुनंदन भावे यांनी सांगितले.
- किल्ल्याचे काम काळजीपूर्वक होणे गरजेचे
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर गडकिल्ले आठवतात. गडकिल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतूट नाते आहे. यामुळे या किल्ल्यांचे काम अत्यंत काळजीपूर्वक व उच्च गुणवत्तेने होणे गरजेचे आहे. अन्यथा तो छत्रपती शिवरायांचा अवमान ठरेल, असे हर्णैतील दीपक खेडेकर यांनी सांगितले.
- जुने बांधकाम कोसळले: पुरातत्व विभाग
दापोली तालुक्यातील हर्णैमधील गोवा किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. या किल्ल्यातील जुने बांधकाम कोसळलेले आहे. नवीन बांधकाम कोसळलेले नाही, असा अजब दावा पुरातत्व विभागाने केला आहे. शिवाय आपण प्रत्यक्ष जाऊन याची खातरजमा केलेली आहे, असेही पुरातत्व विभागाचे रत्नागिरीतील अधिकारी वाहणे यांनी बोलताना सांगितले. मात्र प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता नवीन काळ्dया दगडांचे झालेले बांधकाम कोसळल्याचे दिसत आहे. शिवाय बांधकामासाठी वापरण्यात आलेली वाळूही घटनास्थळी अजून पडून आहे. तरीही पुरातत्व विभागाच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.








