मंदिर प्रांगणात भाविकांच्या लांबच लांब रांगा
वर्षाचा पहिला दिवस देवी आईच्या चरणी
कोल्हापूर
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो भाविक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात आई अंबाबाईच्या आशीर्वादाने नवीन संकल्प धरून करण्यासाठी हजारो भाविक अंबाबाई मंदिरात सकाळपासूनच दाखल झाले आहेत. नववर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करण्यासाठी सकाळपासून मंदिर परिसरात गर्दी आहे.

मंदिर परिसरामध्ये भाविकांचे लांबच लांब रांगा लागल्या असून परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे नाशिक सह कर्नाटक छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात भक्तगण कोल्हापूरात दाखल झालेले आहे. श्री अंबाबाई मंदिरासोबतच जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळं, मंदीर पर्यटकांनी फुलली आहेत.








