वृत्तसंस्था/ मुंबई
लॉजिस्टिक क्षेत्रातली कंपनी डेलिव्हरी यांनी देशातील 15 प्रमुख शहरांमध्ये एक नवी सेवा सुरू करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. सदरच्या कंपनीकडून 15 शहरांमध्ये एकाच दिवसात ग्राहकांनी नोंदविलेली ऑर्डर घरपोच देण्याची सेवा राबविली जाणार आहे.

या दरम्यान कंपनीचा समभाग शुक्रवारी शेअर बाजारामध्ये सर्वात निच्चांकी स्तरावर पोहोचला होता. 5 टक्के घसरणीसह 466 रुपयांवर डेलिव्हरीचा समभाग बीएसईवर व्यवहार करीत होता.
नव्या सेवे अंतर्गत डेलिव्हरी देशातील 15 शहरांमध्ये ज्या दिवशी ऑर्डर नोंदविली आहे, त्याच दिवशी ग्राहकांना त्यांची वस्तू पोहोचविण्याची महत्त्वाची सेवा देणार आहे. इतर काही कंपन्यांची मदत याकामी घेतली जाणार आहे.









