9 नोव्हेंबरला ओटीटीवर होणार स्ट्रीम
अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन हे कलाकार असणारी प्रसिद्ध वेबसीरिज ‘ब्रीद ः इन टू शॅडेंज’ सीझन 2चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी सीरिजच्या सीझन 1 ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर अभिषेक स्वतःच्या सर्वात लोकप्रिय वेबसीरिजसोबत ओटीटीवर ठसा उमटविण्यासाठी तयार आहे.

सीरिजच्या दुसऱया सीझनमध्ये सैयामी खेर आणि नवीन कस्तुरिया हे कलाकार दिसून येणार आहेत. ट्रेलरमध्ये नवीन अत्यंत वेगळय़ा शैलीत दिसून येत आहे. तर अभिषेकची व्यक्तिरेखा पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक दर्शविण्यात आली आहे. मागील सीझनमध्ये प्रमाणेच अमित साध पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे. अभिषेक बच्चन मागील वेळेप्रमाणे डय़ुअल पर्सनॅलिटी पेशंट असून तो अविनाश या भूमिकेत दिसून येणार आहे. ब्रीद ः इन टू द शॅडोजचा दुसरा सीझन 9 नोव्हेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाणार आहे.









