नवी दिल्ली :
महिंद्रा अॅण्ड महिंद्राने लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पिओ एन, झेड 8 सिलेक्टचे नवीन मॉडेल बाजारात सादर केले आहे. हे मिड व्हेरिएंड झेड 6 आणि टॉप लाईन मॉडेल झेड8 दरम्यान ठेवलेले आहे. झेड8 सिलेक्ट पेट्रोल आणि डिझेल इंजिन आणि ट्रान्समिशन पर्यायासह ऑफर केले आहे.
कार 70 हून अधिक कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांसह येते. याची सुरुवातीची किंमत ही 16.99 लाख रुपये आहे. स्कॉर्पिओ एन झेड 8 सिलेक्ट मॉडेल हे नवीन झेड 8 मॉडेलपेक्षा 1.66 लाख रुपयांनी स्वस्त आहे. स्कॉर्पिओ एन ची किंमत ही 13.60 ते 24.54 लाख रुपये राहणार (एक्स शोरुम )आहे. 1 मार्च 2024 पासून डिलरशिपवर ही गाडी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.









