दररोज 1,600 किमी प्रवास करणार, खर्च कंपनी करणार
वॉशिंग्टन :
स्टारबक्सचे नवीन सीईओ ब्रायन निकोल आपल्या नवीन कार्यालयात पोहोचण्यासाठी दररोज 1,600 किलोमीटर प्रवास करतील. त्यांना कंपनीकडून प्राप्त झालेल्या ऑफर लेटरनुसार, पॅलिफोर्नियामध्ये राहणारे निकोल दररोज कॉर्पोरेट जेटने सिएटलमधील स्टारबक्स मुख्यालयात पोहोचणार आहेत. निकोल यांना 1.6 दशलक्ष डॉलर्स वार्षिक मूळ वेतन मिळेल. याशिवाय, ते कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून 3.6 दशलक्ष त 7.2 दशलक्ष डॉलर्स बोनससाठी पात्र असतील. त्यांना 23 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वार्षिक इक्विटी प्राप्त करण्याची संधीदेखील आहे.









