नंदगड प्रतिनिधी – नंदगड ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी उपाध्यक्ष मंन्सूर तासीलदार यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे ठोकले.नंदगड ग्रामपंचायतीत ६५ लाखाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप यापूर्वीच तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या कडे करण्यात आला आहे. महिना उलटला तरी या गैरव्यवहाराची चौकशी झालेली नाही. किंवा गैरव्यवहार केलेल्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. गैरव्यवहाराची चौकशी व्हावी म्हणून गुरुवारपासून ग्रामपंचायतीच्या २३ सदस्या पैकी १९ संतप्त सदस्यांनी आज सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतच्या कार्यालयाला टाळे ठोकले व सत्याग्रह कायम सुरू ठेवला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









