ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य खासदारांची नावं आता समोर आली आहेत. शिंदे गटाच्या बैठकीला या खासदारांनी हजेरी लावली होती. शिवसेनेचे हे 12 खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, नवा गटाच्या प्रतोद पदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक आणि श्रीरंग बारणे हे खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे बंडखोर खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात येणार आहे. यात राहुल शेवाळे गटनेते आणि भावना गवळी यांची प्रतोदपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हे बंडखोर खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. या शक्यतेनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्री दिल्लीत; ठाकरेंना आणखी एक धक्का देणार?