अपर्णा यादव यांना भाजपकडून संधी शक्य
लखनौ
उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ शहराच्या महापौरपदासाठी भाजपकडून दिग्गज महिला नेत्या शर्यतीत आहेत. महापौरपद महिलेसाठी राखीव असल्याने भाजपमध्ये सामील मुलायम सिंह यादव याची सून अपर्णा यादव यांचेही नाव चर्चेत आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौर पदासाठी माजी उपमुख्यमंत्री आणि माजी महापौर डॉ. दिनेश शर्मा यांच्या पत्नी जयलक्ष्मी शर्मा यांचेही नाव घेतले जात आहे. तर विद्यमान उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या पत्नी नम्रता पाठक यांचेही नाव चर्चेत आहे.
मागील महापौर संयुक्ता भाटिया अन् त्यांची सून रेशू भाटिया देखील महापौरपदासाठी इच्छुक आहेत. याचबरोबर आमदार नीरज बोरा यांच्या पत्नी बिंदू बोरा यांचेही नाव चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये महापौरपदासाठी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियांका गुप्ता यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रियांका गुप्ता यांना प्रियांका वड्रा यांच्या निकटवर्तीय माले जाते. तर बहुजन समाज पक्षाच्या वतीने अद्याप कुणीच महापौरपदासाठी दावेदारी केलेली नाही.









