शहरातील सीसीटीव्ही फुटेजचा दर्जा खराब
प्रतिनिधी/ सातारा
शहरात सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही हे शोपीस बनले आहेत. या सीसीटीव्हीच्या फुटेजचा दर्जा कमी असल्याने कैद होणारी घटना अस्पष्ट दिसत आहे. यामुळे पोलिसांपुढे चोरापेक्षा सीसीटीव्हीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचा फायदा घेऊन चोरटय़ाचा धुमाकुळ शहरात सुरू आहे. तरीही सातारा नगरपालिका डोळे घट मिटून बसल्याच्या चर्चा शहरातील नागरिकांमध्ये सुरु आहेत.
लुटमार, जबरी चोरी, वृद्धांची फसवणूक, चेन स्नेचिंग, छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या घटनांना आळा बसून आरोपी लवकर जेरबंद व्हावेत. पोलिसांनी तात्काळ अशा घटनांची माहिती मिळावी म्हणून जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव 2017 झाली तयार करण्यात आला होता. याला मंजुरी मिळून 30 लाख रूपये फंड ही मंजूर झाला. याचे टेंडर सातारा नगरपालिकेने काढले आणि शहरातील वाढेफाटा, गोडोली, ग्रेड सेपरेटर, मोती चौक व इतर भागात हे सीसीटीव्ही बसवण्यात आले. यामुळे संपूर्ण शहरावर तिसरा डोळ्याचा वॉच वाढला. असे असताना अवघ्या काही दिवसात या सीसीटीव्हीचा दर्जा कमी असल्याचे समोर आले. विविध घडणाऱया घटना कॅमेऱयात कैद झाली तरी ती अस्पष्ट दिसते. यामुळे चोरटय़ाचा चेहराही पोलिसांना दिसेनासा झाला आहे.
दोन वर्ष होऊनही हे सीसीटीव्ही बदलण्यात आलेले नाहीत. तसेच यांची दुरूस्ती व इतर सुविधा वेळेवर पूर्ण होत नाहीत. त्यामुळे पोलिस सुरक्षिता वाढावी म्हणून प्रयत्न करत आहेत. तर नगरपालिका डोळे घट्ट मिटून बसली आहे. याचा फायदा मात्र चोरटय़ांनी घेतला असून गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही बसवलेल्या परिसरात आगामी कालावधीत एकादी गुह्याची मोठी घटना घडल्यास तपासासाठी पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे लवकरात पालिकेने याकडे लक्ष देऊन सीसीटीव्ही बदलणे गरजेचे झाले आहे.
नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर
जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातील विविध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव 2017 झाली तयार करण्यात केला होता. याला मंजुरी मिळून 30 लाख रूपये फंड ही मंजूर करण्यात येऊन याचे टेंडर सातारा नगरपालिकेने काढले. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद होवू लागल्या मात्र कालांतरानंतर त्याचा दर्जा खराब होत आहे. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चोऱया, लुटमार, मारामारी आदींच्या घटनात वाढ होत असल्याने पालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या कधी येणार लक्षात
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यामध्ये पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि सीसीटीव्ही बसले. परंतु यांचा दर्जा खराब असल्याचे लक्षात येऊनही हे बदलण्याची मागणी अद्याप का करण्यात आलेली नाही. यांचे कारण गुलदस्त्यात आहे. यामुळे नगरपालिका ही याकडे डोळेझाक करत असल्याच्या चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरु आहेत.









