कोल्हापूर :
मान्सूनपूर्व पावसातच नद्यांच्या पाणीपातळीत वाढत होत आहे.यंदा मॉन्सूनचे आगमनही लवकर होत आहे.यामुळे संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने मुख्य इमारतीच्या स्थायी समितीच्या सभागृहात सेंट्रल वॉर रुम सुरु केली आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढ होत असल्याने सोमवार पासून वॉर रुम सुरु करण्यात आली आहे. महापालिकेने यापुर्वी अगिनशमन विभाग, चारही विभागीय कार्यालयामध्ये आपत्तीच्या काळात व्यवस्थापन व पूर परिस्थितीच्या काळात नागरीकांच्या सोईसाठी मदत कक्ष सुरु केले आहेत.
यामध्ये विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान (0231-2622262), विभागीय कार्यालय क्रं. 2 छ.शिवाजी मार्केट (0231-2543844), विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी (0231-2521615), विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केट (0231-530011) या क्रमांकाशी संपर्क साधावा. या मदत केंद्राबरोबर नागरीकांच्या सोईसाठी सेंट्रल वॉर रुम सुरु करण्यात आली आहे. या वॉर रूममध्ये 0231-2542601, 2545473 या दोन फोन क्रमांकावर नागरीकांनी आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. वादळ/पावसामुळे पडलेली झाडे उचलणे, स्थलांतरीत ठिकाणांची माहिती देणे,घराची पडझड झाल्यास माहिती देणे, स्थलांतरासाठी ठिकाणांची माहिती देणे, पूराच्या अनुषं गक मदतीसाठी वॉर रुम सुरु करण्यात आली आहे. पूराच्या कालावधीमध्ये नागरीकांनी या वॉर रुमशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.








