चित्रपटाचा टीझर सादर
‘प्रेमाची गोष्ट’ हा 2013 साली प्रदर्शित झालेला एक सुंदर मराठी चित्रपट होता. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘प्रेमाची गोष्ट 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘प्रेमाची गोष्ट 2’ हा सतीश राजवाडेंचा नवा रोमँटिक ड्रामा असून यात प्रेम आणि नशीब यांच्या अद्भूत खेळाची कहाणी पहायला मिळणार आहे. या चित्रपटात नवीन कलाकारांची टीम दिसून येईल. ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी, भाऊ कदम, अविनाश नरेकर, रामकांत दयामा, राजेश मापुसकर हे कलाकार असणार आहेत.
हा चित्रपट 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ती सध्या काय करते’, ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा दाखविल्या, आता प्रेमाची गोष्ट 2 आणखी एका प्रेमकथेचा उत्कृष्ट अनुभव देणार आहे. आजच्या पिढीचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पाहता साजेशी अशी अनोखी प्रेमकथा घेऊन येत आहोत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याकडून हटके प्रेमकथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येईल, असे निर्माते संजय छाब्रिया यांनी म्हटले आहे.









