लाइव्ह-अॅक्शन मूव्ही ‘गॉडजिला मायनस वन’चा धमाकेदार ट्रेलर जारी करण्यात आला आहे. या अॅक्शन आणि व्हीएफएक्सने भरपूर चित्रपटाचे दिग्दर्शन तमासी यामाजाकी यांनी केले आहे. चित्रपटातील दृश्य पाहून अंगावर काटा येतो. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगावर हा चित्रपट आधारित आहे. गॉडजिला मायनस वन या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एपिक गॉडजिलाची वापसी अन् आयकॉनिक काइजूच्या विरोधात जबरदस्त युद्ध दाखविण्यात आले आहे. यात रोमांचक दृश्य असून जपानच्या लोकांना दुसऱ्या महायुद्धानंतर किती अडचणींना सामोरे जावे लागले होते, हे यात दाखविण्यात आले आहे. तमाशी यांनी दिग्दर्शन अन् लेखनासोबत चित्रपटाच्या व्हीएफएक्सचीही जबाबदारी सांभाळली आहे. हा चित्रपट जपानी भाषेतील 33 वा गॉडजिला चित्रपट असून फ्रेंचाइजीत एकूण 37 वा चित्रपट आहे. 2016 मध्ये गाजलेल्या ‘शिन गॉडजिला’नंतर ‘गॉडजिला मायनसव न’ हा अॅक्शन जपानी चित्रपट आहे. हा जपानी चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट आयमॅक्स, 4डीएक्स आणि एमएक्स4डी मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. जपानमध्ये हा चित्रपट काही 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा प्रीमियर 36 व्या टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हमध्ये समारोपाचा चित्रपट म्हणून केला जाणार आहे.
Previous Articleथर्मन षणगुमरत्नम सिंगापूरच्या राष्ट्रपतिपदी
Next Article अरविंद केजरीवाल यांना मानहानी प्रकरणी झटका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









