नवी दिल्ली
मोटोरोला कंपनीचा नवा मोटो जी 82 5जी स्मार्टफोन आज (मंगळवार) 7 जून रोजी लाँच केला जाणार असून त्याची किंमत 25 हजाराच्या आसपास असणार आहे. चांगल्या गुणवत्तापूर्व हार्डवेअरमुळे सदरचा फोन थोडा महागडा असल्याचे सांगितले जाते.
मोटोरोलाच्या अधिकृत ट्वीटर संकेतस्थळावर नव्या फोनचा फोटो टाकण्यात आलाय. स्मार्टफोनची किंमत 25 हजार ते 26 हजार रुपयांच्या घरात असेल. 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह हा फोन येणार आहे, असे समजते. सदरच्या फोनचे हार्डवेअर उच्च क्षमतेचे असल्याने किंमत जरा जास्तच आहे. मंगळवारी भारतीय बाजारात सदरचा फोन उपलब्ध होणार आहे. पांढरा व ग्रे रंगात फोन सादर होणार आहे.
आणखी काय खास
w 6.6 इंचाचा डिस्प्ले (होल पंच)
w 50 एमपी ट्रीपल कॅमेरा
w 5000 एमएएच बॅटरी
w 30 डब्ल्यू टर्बो चार्जिंगची सुविधा
w ग्रे व पांढरा रंग
w किंमत 25 हजार 999 रुपये अंदाजित
w
मुख्य कॅमेऱयाला ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन (ओआयएस) चे सहकार्य









