एकटय़ाने जाण्यास आहे मनाई
सोशल मीडिया हा थक्क करून सोडणाऱया कंटेंटचा भांडार आहे, इंटरनेटवर अनेक युजर्स कधीकधी नव्या आणि अनोख्या गोष्टी शेअर करत असतात. सध्या इंग्लंडमधील एक छायाचित्र सध्या इंटरनेटवर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. हे छायाचित्र जगातील सर्वात विषारी उद्यानाचे असून तेथे 100 हून अधिक प्रकारची धोकादायक रोपं आढळून येतात.
या उद्यानाला ‘द पॉइजन गार्डन’ या नावाने ओळखले जाते. इंग्लंडच्या नॉर्थबरलँड काउंटीच्या अलनविकमध्ये हे उद्यान आहे. छायाचित्रात उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील ‘द पॉइजन गार्डन’ असा फलक दिसून येतो. या उद्यानात येणाऱया लोकांना सर्वप्रथम स्पष्टपणे फुले न तोडण्याचा आणि त्यांचा गंध न घेण्याची सूचना केली जात असते.

उद्यानाच्या प्रशासनानुसार येथे दरवर्षी सुमारे 6 लाख लोक येतात, या लोकांना केवळ निर्देशित पर्यटन करण्याची अनुमती असते. परंतु अनेक इशाऱयांनंतरही काही लोक या घातक रोपांच्या गंधामुळे बेशुद्ध होत असतात.
पर्यटकांसह येथे जगभरातील वनस्पतीशास्त्रज्ञ देखील मॉन्क्सहुड, रोडोडेंड्रोन आणि वुल्फ्स बॅन या विषारी रोपांना पाहण्यासाठी येत असतात. या उद्यानाला रिकिनचे घर असेही म्हटले जाते. जे सर्वसाधारणपणे कॅस्टर बीन प्लांटच्या नावाने ओळखले जाते. रिकिन हे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार जगातील सर्वात विषारी रोप आहे.
एका नियतकालिकात प्रकाशित लेखानुसार या उद्यानाची निर्मिती डचेस ऑफ नॉर्थबरलँडकडून करविण्यात आली होती. वनौषधींऐवजी त्यांनी एक पॉइजन गार्डन तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या उद्यानात यू ट्री स्वतःच्या विषासाठी ओळखले जाते, ज्याला टॅक्सिन देखील म्हटले जाते. हे रोप कुणालाही 20 मिनिटांच्या आत मारण्याची क्षमता बाळगून आहे, परंतु बहुतांश लोक याच्या विषयी अनभिज्ञ असतात. हे रोप टॅक्सोल निर्माण करते, जे कर्करोगावरील उपचारासाठी देखील वापरण्यात येते. या उद्यानात अनेक प्रकारची रोपं आढळून येतात.









