जन्म झाल्यावर अंध होतात माणूस अन् प्राणी
जगातील रहस्यमय ठिकाणांमध्ये मेक्सिकोचे एक गाव देखील सामील आहे. या गावात मुलांच्या जन्मानंतर काही असे घडते जे अत्यंत हैराण करणारे आहे. या गावात मुले जन्माला आल्याच्या काही दिवसांनी त्यांची दृष्टी जाते. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे माणसांपासून प्राणी देखील तेथे अंध होतात.
मेक्सिकोच्या या गावाला अंधांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. या अजब कारणामुळे हे गाव पूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहे. अशाप्रकारचे जगातील हे पहिलेच गाव आहे. मेक्सिकोच्या टिल्टेपक गावात माणसांपासून प्राण्यांपर्यंत सर्वजण अंध आहेत. टिल्टेपक गाव जगातील सर्वात रहस्यमय गावांपैकी एक आहे. जगातील हे एकच असे गाव आहे, जेथे केवळ अंध राहतात.
या गावात जेपोटेक समुदायाचे वास्तव्य आहे. येथे मूल जन्माला आल्यावर त्याची दृष्टी चांगली असते, परंतु काही काळानंतर हे मूल दृष्टीक्षमता गमावून बसते. हा प्रकार केवळ माणसांसोबत घडतो असे नाही तर प्राण्यांसोबतही असेच घडत आहे.

कारण काय असावे
या गावात राहणाऱया समुदायाचे लोक अंध असण्यामागे शापित वृक्ष कारणीभुत असल्याचे मानतात. लावजुएला नावाच्या एक वृक्ष असून तो पाहिल्यावर माणसांपासून पशुपक्षी सर्व अंध होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या गावात कित्येक वर्षांपासून हा वृक्ष आहे. हा वृक्ष पाहिल्यावर अंध होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. परंतु काही लोकांचे ही केवळ अंधश्रद्धा असल्याचे मानणे आहे.
तज्ञांचे मत
या गावात अत्यंत विषारी मधमाशा आढळून येतात. या मधमाशांच्या दंशामुळे लोक अंध होत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. या गावासंबंधी माहिती मिळताच मेक्सिकोच्या सरकारने ग्रामस्थांना मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारला अद्याप कुठलेच यश मिळू शकलेले नाही. सरकारने या समुदायाला अन्यत्र वसविण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱया ठिकाणचे हवामान त्यांच्यासाठी अनुकूल नव्हते. आता या लोकांना त्यांच्या स्थितीत सोडून देण्यात आले आहे.









