जगात ज्याप्रकारे आस्तिक आणि नास्तिक आहेत, त्याचप्रकारे काही लोक भूतांवर विश्वास ठेवतात तर काही लोकांनुसार भूतांचे अस्तित्व नसते. जर तुम्ही भूताच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी असाल तर ब्रिटनमधील एका गावाबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्रिटनमधील या छोट्याशा गावात रस्त्यांवर फिरताना तुम्हाला विचित्र अनुभव येतील.

केंटच्या प्लकली नावाच्या गावाला जगातील सर्वात भीतीदायक अन् भुताटकीयुक्त मानले जाते. या गावात एकूण 12 अशी ठिकाणे आहेत, जेथे भूतांचा वावर असल्याचे मानण्यात येते. या गावात भूतं असल्याची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदविण्यासाठी लोकांना प्रचंड मेहनत करावी लागते, या रेकॉर्ड बुकमध्ये नाव सामील करण्यासाठी अनेक पुरावे सादर करावे लागतात. अशा स्थितीत गिनिज बुक ऑफ रेकॉर्डने या गावात भूतांचा वावर असल्याचे मान्य केले आहे.
या गावात अनेक साहसी पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या गावाला स्टे व्हेकेशनसाठी ओळखले जाते. या गावात 12 अशी ठिकाणं आहेत, जेथे लोकांनी दिवसा किंवा रात्री कुठल्याही वेळी भूत पाहिल्याचे सांगण्यात येते. अत्यंत सुंदर असलेल्या या गावात तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील, या गावात चर्च, स्कूल, रेस्टॉरंट आणि अनेक दुकाने देखील आहेत.
हे गाव भुताटकीयुक्त असल्याचे माहित असूनही अनेक लोक येथे सुटी व्यतित करण्यासाठी येतात. या गावाला मोठा इतिहास असून येथे पहिल्या महायुद्धातील अनेक सैनिक राहत होते. हे सैनिक मृत्यूनंतर स्वत:च्या कुटुंबाला भेटण्यासाठी भूत बनून परतल्याचे सांगण्यात येते.









