या किमतीत येईल एक एसयुव्ही कार
भीषण उष्णता असो किंवा थंडी चहाप्रेमी चहासाठी कुठवरही प्रवास करू शकतात असे बोलले जाते. भारतात चहाबद्दलचे असणारे प्रेम जगात कुठेच दिसून येत नाही. भारतीय चहाप्रेमी असले तरीही चीनने चहाचा आविष्कार केला आहे. चहाने मोठा प्रवास करत चीनमधून भारतात प्रवेश केला होता. जगात जवळपास 35 टक्के चहा चीनमध्ये पिला जातो. तर जगातील सर्वात महाग टी बॅगसंबंधी माहिती समोर आली आहे. बुडल्स ज्वेलर्स पीजी टिप्सला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 10 हजार डॉलर्सची एक टी-बॅग निर्माण करण्यात आली होती.
या टी बॅगमध्ये 2.56 कॅरेटचे 280 हिरे जडविण्यात आले होते आणि यात चहाची सुकविण्यात आलेली पानं होती. ही पांढऱ्या रंगाची छोटीशी बॅग होती, ज्याची चेन सोन्याची होती आणि यावर 80 हिरे जडविण्यात आली होती.
तर जगातील सर्वात महाग चहा दा होंग पाओ आहे. हा प्रकार चीनमध्ये अत्यंत लोकप्रिय असून याची किंमत कळल्यावर धक्काच बसतो. याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे. जर तुम्हाला दा होंग पाओ चहा खरेदी करायचा असेल तर याच्या एक किलो पावडरसाठी 1 कोटी रुपये खर्च करावे लागतील. या चहाची गुणवत्ता उच्च दर्जाची असल्याने तो अत्यंत महाग आहे.
या चहाचे पीक फुजियान प्रांतातील समृद्ध अणि खडकाळ वुईच्या पर्वतांमध्ये घेतले जाते. यात एक खास वुडी प्रेंगरेन्स आणि स्मूथ टेक्सचर असतो. चहाचा स्वाद हवामानानुसार वेगळाही असू शकतो. या चहाचे मळे खूपच कमी असल्याने तो अत्यंत महाग आहे. या चहाच्या मळ्यांना मदर्स ट्री म्हटले जाते तसेच याचे प्रमाण खूपच कमी आहे. याचमुळे चीनमध्ये त्यांना नॅशनल ट्रेडरच्या स्वरुपात घोषित करण्यात आले आहे. तर या चहाला लिक्विड गोल्डप्रमाणे मानले जाते. याचा गंध अन् स्वाद याला अनोखे स्वरुप देतात.









