250 ग्रॅम मिठाची किंमत 7500 रुपये
मिठाशिवाय आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. मिठाशिवाय प्रत्येक खाद्यपदार्थ बेचव होत असतो. मीठ स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक गोष्ट आहे. मिठाची किंमत काही देशांमध्ये अधिक असते तर काही देशांमध्ये हे अत्यंत स्वस्त विकले जाते. परंतु एका प्रकारचे मीठ अत्यंत महाग असून त्याच्या 250 ग्रॅमसाठी 7500 रुपये खर्च करावे लागतात. भारतात मीठ तुलनेत स्वस्त असून अमेरिकेसारख्या देशांमध्ये हे मीठ अधिक किमतीचे आहे. जगातील सर्वात महाग मीठ कोरियन असून ते खास पद्धतीने आणि खास वस्तूने तयार केले जाते. हे कोरियन बांबूने तयार केले जाते. या कोरियन बांबू मीठाला जुग्योम या नावाने देखील ओळखले जाते.
कोरियन बांबू मीठाची किंमत 250 ग्रॅमसाठी सुमारे 100 डॉलर्स म्हणजेच 7500 रुपये इतकी आहे. कोरियन बांबू मिठाची किंमत अधिक असण्यामागे याची निर्मिती प्रक्रिया आहे. हे मीठ अत्यंत जटिल प्रक्रियेनंतरच निर्माण होऊ शकते. प्राचीन काळापासून कोरियन लोक स्वयंपाक आणि पारंपारिक औषधाच्या स्वरुपात या मीठाचा वापर करत राहिले आहेत. हे मीठ बांबूत सामान्य सागरी मीठ टाकून आणि त्याला उच्च तापमानावर तापवून तयार केले जाते. याला एमेथिस्ट बँम्बू म्हटले जाते, हे मीठ कोरियात तयार केले जाते, याच्या निर्मितीकरता अत्यंत अधिक वेळ लागत असतो.
या मिठाला बांबूच्या सिलिंडरमध्ये भरून नीलम बांबूचे मीठ तयार केले जाते. या प्रक्रियेकरता 50 दिवस लागतात. मिठाने भरलेल्या बांबूच्या सिलिंडरला अनेकदा उच्च तापमानावर गरम केले जाते, यामुळे बांबूचे गुणधर्म या मिठात सामावले जातात. याला कमीतकमी 9 वेळा 800 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर गरम केले जाते. यामुळे मिठाला बांबूतून खनिजे मिळतात, तसेच याचा रंग अन् आकारही बदलतो. याकरता कुशल कारागिरांकडून संचालित विशेष भट्ट्यांची आवश्यकता असते. या पूर्ण प्रकियेला अत्यंत मेहनत आणि कालावधी लागतो, जो याचा उत्पादन खर्च वाढवितो.
या मिठाचे लाभ
बांबूच्या मिठात नियमित सागरी मिठाच्या तुलनेत आयर्न, पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारख्या आवश्यक खजिनांचा उच्च स्तर असतो असे मानले जाते. ही खनिजं पाचन आणि मौखिक आरोग्यासह अनेक आरोग्य पैलूंना सुधारतात. शतकांपासून बांबूच्या मिठाचा वापर कोरियन पारंपरिक चिकित्सेत याच्या कथित चिकित्सीय गुणांसाठी केला जात राहिला आहे.
सूजविरोधी गुणधर्म
बांबू मीठ सूज कमी करण्याच्या स्वत:च्या क्षमतेसाठी ओळखले जाते. या मिठामुळे सूज कमी होते आणि संबंधित भागातील वेदना कमी होतात. हे मीठ तोंडात येणारे फोड अन् हिरड्यांमधील सूज दूर करण्यास उपयुक्त आहे. तसेच ते बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करू शकते, यामुळे मौखिक स्वच्छतेत सुधारणा होते.
क्षारीय प्रभाव
उच्च पीएच स्तरासोबत बांबू मीठ शरीराला क्षारीय करण्यास मदत करते, हे कॅन्सर समवेत हानिकारक बॅक्टेरिया आणि आजारांसाठी प्रतिकूल वातावरण तयार करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हा क्षारीय प्रभाव आम्लीय खाद्यपदार्थांनाही निष्प्रभ करू शकतो. बांबू मिठात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम समवेत 70 हून अधिक खनिजं असतात.
अँटीऑक्सिडेंट
हे मीठ शरीरात अँटीऑक्सिडेंट अॅक्टिव्हिटीजना उत्तेजित करते, यामुळे मधूमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या जुन्या आजारांकरता योगदान देणाऱ्या कणांना संपविण्यास मदत मिळते. स्वत:च्या जीवाणूप्रतिरोधक गुणधर्मामुळे हे मीठ शरीराला हानिकारक रोगजनकांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत करत प्रतिरोधक कार्य वाढवू शकते.
विषारी पदार्थांना करते निष्प्रभ
हे मीठ विषारी घटकांना निष्प्रभ करत शरीराच्या समग्र आरोग्यात सुधारणा करत असल्याचे मानले जाते. हे त्वचेचे संक्रमण रोखणे आणि स्वत:च्या जीवाणूविरोधी गुणांमध्ये एक्झिमा सारख्या त्वचेच्या स्थितीत सुधारणा करण्यास मदत करू शकते. या मिठाच्या सेवनामुळे हार्मोनल संतुलनाला बळ मिळत तणावाची पातळी कमी होऊ शकते.









