पूर्वी महाराजा विमानांसाठी प्रसिद्ध होता, हे आपल्या स्मरणात आहे. आता याच नावाची एक एक्स्प्रेस गाडी भारतीय रुळांवरुन धावणार असून तिच्यातला प्रवास सर्वात महागडा ठरणार आहे. हा खर्च विमानप्रवासाच्या खर्चापेक्षाही जास्त असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. या सर्वात महागडय़ा गाडीचा एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला असून आतापर्यंत तो 35 लाख लोकांनी पाहिला आहे.

या गाडीत आपल्याला पंचतारांकित सुविधा मिळणार आहेत. या सोयी आणि सुविधा विमानांमध्ये मिळणाऱया सोयींपेक्षाही अधिक आहेत. या गाडीचे व्यवस्थापन आणि सुरक्षा आयआरसीटीसीकडून केली जाणार आहे. ही एक लक्झरी रेल्वे गाडी आहे. यातून तुम्ही एक सप्ताह इतका कालावधी चार विविध रेल्वेमार्गांवरुन प्रवासाचा आनंद घेऊ शकता. या गाडीच्या आतील दृष्य आपल्याला आवाप् करणारे असेल असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला. या गाडीत विद्यार्थ्यांना किंवा स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी जाणाऱया उमेदवारांनाही अभ्यासाच्या सुविधा असणारे विशेष डबे जोडण्याची सुविधा आहे, जेणेकरुन विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना रेल्वेतही अखंडपणे अभ्यास करता यावा. याशिवाय विविध प्रकारची फर्निचर्स, सोफे, बेडस् आणि इतर सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.









