जगात एकाहून एक उच्च गुणवत्तेचे मद्य उपलब्ध आहे. मद्यपींचे स्वत:चे पसंतीचे ब्रँड देखील आहेत. परंतु एका मद्याचे नावच ‘द बिलियनेर व्होडका’ असून याची किंमत इतकी अधिक आहे की, आपल्या पिढ्या बसून खातील. तरीही या अत्यंत महाग मद्याचे सेवन करणाऱ्या लोकांची संख्या जगात कमी नाही. हे महागडे मद्य लियोन वेर्स नावाच्या कंपनीकडून तयार करण्यात येते. या मद्याचे नाव ‘द बिलियनेर व्होडका’ असून ती जगातील निवडक ठिकाणीच उपलब्ध आहे. याच्या एका बाटलीची किंमत 3.7 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय चलनात ही रक्कम 30 कोटी 36 लाख रुपये इतकी होते. एखाद्या अब्जाधीशाने या व्होडकाचा आनंद घ्यायचा विचार केला तरीही त्याचे बिल कोट्यावधींमध्ये येणार आहे. या व्होडकाच्या 5-7 बाटल्या एखाद्या पार्टीत आणणे साधी गोष्ट नाही. द बिलियनेर व्होडकाच्या एका बाटलीच्या किमतीत मुंबईत आलिशान घर विकता घेता येईल. मद्यपान करण्यासोबत ते अनुभवणे हा एक प्रकार असतो. ही व्होडका खरोखरच जगातील सर्वोत्तम प्रतीची आहे. याच्या निर्मितीची प्रक्रिया अत्यंत खास आहे. यात वापरण्यात आलेले पाणी जगातील सर्वात शुद्ध पाणी आहे. या पाण्याला कोट्यावधी रुपयांच्या हिऱ्यांद्वारे स्वच्छ केले जाते. याचबरोबर यात वापरण्यात येणारी रेसिपी आजपर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.
अत्यंत आकर्षक पॅकिंग
मद्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच त्याचे पॅकिंग. या व्होडकाचे पॅकिंग अत्यंत अद्भूत वाटावे असे आहे. याला हिरेजडित बाटलीत पॅक करण्यात आले आहे. याच्या बाटलीला एखाद्या अब्जाधीश राजकन्येप्रमाणे सजविण्यात आले जाते. याकरता हिरे-रत्न वापरण्यात आले असून कंपनी या व्होडकाच्या पॅकिंगवर कोट्यावधी रुपये खर्च करते.









