लिपस्टिक महिलांसाठी मेकअपच्या आवश्यक सामग्रीपैकी एक असते. जवळपास प्रत्येक महिला लिपस्टिक लावणे पसंत करते आणि सुंदर दिसण्यासाठी याचा वापर करते. सामान्य लिपस्टिकची किंमत फार अधिक नसते. परंतु जर एखादी लिपस्टिक कोट्यावधी रुपयांमध्ये मिळत असेल तर ती तुम्ही खरेदी कराल का? जगातील सर्वात महाग लिपस्टिकचे नाव एच. कॉउचर ब्यूटी डायमंड असून याच्या किमतीत 2-3 आलिशान फ्लॅट्स खरेदी करता येतात. या महाग लिपस्टिकची किंमत सुमारे 115 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही लिपस्टिक महाग असण्यामागे कारण याची केस आहे. या केसमध्ये 1200 हून अधिक हिरे जडविण्यात आलेले आहेत.
याचबरोबर जर ही लिपस्टिक कुणी खरेदी करत असेल तर त्याला लाइफटाइम रीफिल आणि ब्यूटी सर्व्हिसही मिळते. म्हणजेच एकदा ही लिपस्टिक खरेदी केल्यास कधीही ती संपल्यावर पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही. तर आयुष्यभरासाठी संबंधिताला यात रीफिलिंग मिळत राहणार आहे. तर दुसरी सर्वात महाग लिपस्टिक गुएरलेन ब्रँडची लिपस्टिक असून याची किंमत 51 लाख रुपयांच्या आसपास आहे. याच्या केसला 18 कॅरेटच्या सॉलिड गोल्डद्वारे तयार करण्यात आले आहे. याच्या केसवरही 199 हिरे जडविण्यात आले आहे. याची खरेदी करणारी महिला स्वत:चे नाव आणि डिझाइन स्वत:हून कस्टमाइज करवू शकते. तर तिसरी सर्वात महाग लिपस्टिक स्वारोस्की क्रिस्टलची रीफिलेबल लिपस्टिक असून ती 400 डॉलर्समध्ये मिळते.









