ऑडी-बीएमडब्ल्यूइतकी किंमत
कीडय़ाची किंमत कोटय़वधी रुपयात असल्याचे कळल्यावर लोकांना धक्का बसत असला तरीही हे पूर्ण सत्य आहे. पृथ्वीवर 2-3 इंचाचा एक असा कीडा आढळून येतो, ज्याची किंमत ऑडी-बीएमडब्ल्यूसारख्या आलिशान कारपेक्षा अधिक आहे. काही वर्षांपूर्वी एका जपानी ब्रिडरने एक कीडा 89,000 डॉलर्समध्ये विकला होता. हा पृथ्वीवरील सर्वात छोटा, अजब आणि दुर्लभ प्रजातींपैकी एक असल्याचे मानले जाते.
या कीडय़ाचे नाव स्टॅग बीटल असून तो लुकानिडेशी संबंधित आहे, यात कीडय़ांच्या 1200 प्रजाती आहेत. याचे पालन करण्यासाठी लोक लाखो-कोटय़वधी रुपये खर्च करण्यास तयार असतात. दिसण्यास हा छोटा असला तरीही तो खरेदी करणे धनाढय़ांनाही शक्य नसते. या कीडय़ाद्वारे अनेक प्रकारच्या असाध्य रोगांमध्ये वापरली जाणारी महागडी औषधे तयार केली जातात, याचमुळे याची किंमत इतकी अधिक आहे. याचमुळे या कीडय़ाची प्रजाती लुप्त होण्याचा धोकाही वाढला आहे.

थंडी असहनीय
हा कीडा इतका नाजुक असतो की त्याला थंडी सहन होत नाही. हिवाळय़ात या कीडय़ाला स्वतःचे रक्षण करता न आल्यास त्याचा मृत्यू होतो. 2 स्टॅग बीटल जेव्हा परस्परांमध्ये लढाई करतात, तेव्हा ते एखाद्या सुमो पैलवानाप्रमाणे परस्परांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात.
अशाप्रकारे ओळखा
या दुर्लभ कीडय़ाची ओळख त्याच्या वैशिष्टय़ांद्वारे करता येते. याच्या डोक्यावर काळय़ा रंगाची शिंग असतात. लोक छंद म्हणून या कीडय़ाला पाळत असतात. हा कीडा केवळ उष्ण ठिकाणीच आढळून येतो. तसेच तो कचऱयात राहत असतो. एवढेच नव्हे तर तो सुमारे 7 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो.
सडणारे लाकूड याचा आहार
लहान स्टॅग बीटल सडत चाललेल्या लाकडाला भक्ष्य करत असतो. प्रौढ स्टॅग बीटल फळांचा रस, झाडांचा रस आणि पाण्यावर जिवंत राहू शकतात. यांची जीभ नारिंगी रंगाची असते, एक स्टॅग बीटलला प्रौढ होण्यास अनेक आठवडय़ांचा कालावधी लागतो. अनेक देशांमध्ये या कीडय़ाला विलुप्त होण्याच्या शेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.









