एका दिवसाच्या भाड्यात खरेदी कराल घर
एका हॉटेलमध्ये एक रात्र वास्तव्य करण्यासाठी द्यावे लागणारे शुल्क ऐकून धक्काच बसेल. येथील वास्तव्याकरता कराव्या लागणाऱ्या खर्चात कुणीही आलिशान घर खरेदी करू शकतो. हे हॉटेल पाण्यात तयार करण्यात आले असून येथे सर्वप्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत.

या हॉटेलमध्ये संबंधिताला स्वत:चा पूर्ण पर्सनल स्टाफ उपलब्ध होणार आहे. येथे पर्सनल कुक दिला जाणार असून हिंडण्यासाठी खासगी हेलिकॉप्टरही पुरविण्यात येणार आहे. ग्राहकाची इच्छा असेल तेव्हा कुक त्वरित ऑर्डरनुसार येथे खाद्यपदार्थ तयार करून देतो.
हे प्रसिद्ध हॉटेल आता जगातील सर्वात महागडे हॉटेल म्हणून ओळखले जाते. द लव्हर्स डीप या नावाने प्रसिद्ध हे सबमरीन हॉटेल आहे. हे हॉटेल एका पाणबुडीत असून कॅरेबियन देश सेंट लूसियामध्ये हे हॉटेल निर्माण करण्यात आले आहे. पाणबुडी हॉटेल विशेषकरून रोमँटिक अनुभव मिळवून देण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्यांना पाण्यातील सुंदर जग अनुभवता येते.

पाणबुडी संबंधितांना खोल समुद्रात घेऊन जाते आणि तेथे समुद्रातील सुंदर दृश्य पाहता येतात. या हॉटेलमध्ये एका दिवसाच्या वास्तव्यासाठी 2,92000 डॉलर्स म्हणजेच 2 कोटी 17 लाख 34 हजार 450 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या हॉटेलमधील वास्तव्याचा खर्च सर्वसामान्यांना निश्चितपणे परवडणारा नाही. एखादा धनाढ्याच या हॉटेलची निवड करू शकतो.









