बीएमडब्ल्यू सीइ-04 मॉडेलचा समावेश ः किंमत जवळपास 20 लाख रुपये राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीएमडब्ल्यू मोटारराइड इंडिया लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर सीई-04 भारतात सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अलीकडेच एका कार्यक्रमात इलेक्ट्रिक स्कूटर ‘सीइ04’ सादर केली. बीएमडब्ल्यू यांनी याच कार्यक्रमात आपली ए1000 आरआर स्कूटर सादर केली आहे. त्याची 20.25 लाख इतकी एक्स-शोरूम किंमत सुरुवातीला राहणार असल्याची माहिती आहे.
बीएमडब्ल्यूची सीइ-04 ही पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक दुचाकी असल्याचे म्हटले जाते आणि लॉन्च केल्यावर ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर बनणार आहे.
बीएमडब्ल्यूने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँचिंगची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. तथापि, 2023 मध्ये भारतात सदरची गाडी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
बॅटरी, रेंज आणि चार्जिंग वेळ
बीएमडब्लूच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8.9 केडब्लूएच एअर-कूल्ड लिथियम-आयन बॅटरी आहे. डब्ल्यूएलटीपी चाचणीनुसार, सीइ-04 एका चार्जवर 129किलोमीटरचे अंतर कापेल. सीइ-04 2.3 केडब्ल्यूचा चार्जर वापरून 4 तास आणि 20 मिनिटांत 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज केली जाऊ शकते.
डिझाइन आणि वैशिष्टय़े
स्कूटरमध्ये एक लांब सिंगल-पीस सीट, 10.25-इंचाच्या टीएफटी डिस्प्लेसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ट्रक्शन कंट्रोल, मल्टिपल राइडिंग मोड यासारखी अनेक वैशिष्टय़े असणार आहेत.









