33 कोटी रुपये किंमत
एका गायीची किंमत कोट्यावधींमध्ये असू शकते यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? ब्राझीलमध्ये वियाटिना-19 नावाच्या एका नेलोर गायीला 4 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 33 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. गायी केवळ दूध देण्यासाठी नसतात, तर काही प्रजातीच्या गायी असाधारण गुणांसाठी ओळखल्या जातात. जपानची वाग्यू आणि भारताची ब्राह्मण गाय याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. या गायी अधिक उष्णतेतही सहजपणे जगू शकतात आणि यांची प्रजाती अत्यंत शुद्ध मानली जाते. याचमुळे त्यांना जगभरात मोठी मागणी आहे.
विटाविना-19 नावाची ही गाय ब्राझीलच्या मिनस गेरॅसमध्ये प्रसिद्ध आहे. ही आतापर्यंतची सर्वात महाग नेलोर प्रजातीची गाय ठरली आहे. या गायीचे वजन 1101 किलोग्रॅम आहे. ही अन्य कुठल्याही साधारण गायीच्या तुलनेत आकाराने दुप्पट आहे. ही गाय केवळ स्वत:च्या स्वत:च्या प्रचंड किंमतीसाठी नव्हे तर शारीरिक रचनेसाठी देखील प्रसिद्ध आहे.
वियाटिना-19 केवळ महाग गाय नसून सुंदरतेप्रकरणीही अव्वल आहे. या गायीने स्वत:चे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे. चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड स्पर्धेत मिस साउथ अमेरिकाचा मान तिने पटकाविला आहे. याची पांढरी, चमकदार त्वचा आणि आकार यामुळे ही उष्ण भागांमध्ये अधिक सहजपणे राहू शकते आणि मजबूत राहू शकते.









