अत्यंत कठिण आहेत स्टेप्स
जगातील सर्वात अवघड नृत्यप्रकार कोणता याचे उत्तर देणे निश्चितच सोपे ठरणार नाही. जगात अनेकप्रकारचे नृत्यप्रकार आहेत, काही नृत्यप्रकारांबद्दल तर यासंबंधीच्या जाणकारांनाही कल्पना नसावी. परंतु आफ्रिकेतील प्रसिद्ध जौली डान्स या प्रश्नाचे उत्तर ठरू शकते. हा नृत्यप्रकार पारंपरिक स्वरुपात पश्चिम आफ्रिकेत आयव्हरी कोस्टच्या गुरो समुदायाकडून केला जात असतो.
हा नृत्यप्रकार सर्वसाधारणपणे विवाहसोहळा, अंत्यसंस्कार आणि दीक्षा यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांदरम्यान केला जातो. या नृत्यप्रकारात अध्यात्मिक आणि उपचारशक्ती असल्याचे मानले जाते. अलिकडेच सोशल मीडियावर हे नृत्य करत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘हा सेंट्रल आयव्हरी कोस्टचा ‘जौली’ डान्स असून याला जगातील सर्वात अवघड नृत्य मानले जात असल्याचे त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

जौली नृत्यप्रकार सर्वसाधारणपणे पुरुषांच्या एका समुहाकडून केला जातो, हा समूह विविध आत्मा आणि प्राण्यांचे प्रतिनिधित्व करणारे मुखवटे परिधान करतात तसेच विशिष्ट वेशभुषा करत असतात. हे मुखवटे लाकडावर कोरून तयार केलेले असतात आणि चमकणाऱया रंगाचे असतात. जटिल डिझाइन आणि प्रतीकात्मक अर्थासह हे मुखवटे असतात. वेशभुषेत घंटा, शंख अणि अन्य सजावटी गोष्टींचा वापर केला जात असतो.
जौली नृत्यप्रकार स्वतःच्या एक्रोबेटिक आणि ऍथलेटिक हालचालींसाठी ओळखला जातो. हा नृत्यप्रकार आत्मसात करण्यासाठी कलाकारांना कठोर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. जौली नृत्यप्रकार गुरो संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा असून पिढय़ानपिढय़ा ही परंपरा चालत आली आहे.

हा नृत्यप्रकार आयव्हरी कोस्टच्या बोआफले आणि ज्यूएनौला शहरातील गुरो समुदायाच्या संस्कृतीचा हिस्सा आहे. हा नृत्यप्रकार स्त्राr सौंदर्याला एकप्रकारची मानवंदना देणारा आहे. जौली दोन प्रकारच्या मुखवटय़ाने प्रेरित आहे, यात ब्लोउ आणि देजेला यांचा समावेश आहे. याचे दुसरे नाव देजेला लोउ जौली देखील आहे.
युनेस्कोनुसार जौली एक शैक्षणिक भूमिका बजावते, तसेच पर्यावरण संरक्षणात योगदान दतेते, एकीकरण आणि सामाजिक एकतेला चालना देते. या नृत्याचे वैशिष्टय़ सांगितिक ताल, नर्तकांच्या पायांचा वेग आणि मुखवटा आहे. मायकल जॅक्सनने जौली नृत्यप्रकाराने प्रेरित स्वतःचा डान्सफॉर्म तयार केल्याचे मानले जाते.









