खिडकीतून बाहेर डोकावताच घाबरून जाल
जगात काही असे रेल्वेमार्ग आहेत, जे रोमांचासोबत भीतीदायक देखील वाटतात. अशा या रेल्वेमार्गांबद्दल जाणून घेणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चेन्नई ते रामेश्वरम मार्ग
चेन्नई आणि रामेश्वरमला जोडणारा चेन्नई-रामेश्वरम रेल्वेमार्ग जगात सर्वात धोकादायक रेल्वेमार्ग मानला जातो. प्रत्यक्षात हा रेल्वेमार्ग हिंदी महासागरावर निर्माण करण्यात आला असून तो 2.3 किलोमीटर लांबीचा आहे. हा रेल्वेमार्ग अशावेळी सर्वात धोकादायक ठरतो, जेव्हा सागरात भरती सुरू होते आणि वेगाने येणाऱ्या लाटा रेल्वेला पुढे जाण्यास अडथळे निर्माण करतात.
सल्टा पोलवेरिलो ट्रॅक, अर्जेंटीना
साल्टाला चिलीच्या पोलवेरिलोशी जोडणारा 217 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग अर्जेंटीना निर्माण करण्यात आला आहे. 1948 मध्ये याचे हा रेल्वेमार्ग सुरू झाला होता आणि याची निर्मिती 27 वर्षांपर्यंत चालली होती. हा रेल्वेमार्ग 4200 फुटांच्या उंचीवर आहे. प्रवासादरम्यान रेल्वे 29 पूल आणि 21 भुयारांना ओलांडते, यामुळे हा प्रवास धोकादायक वाटतो.
डेव्हिल्स नोज, इक्वेडोर
नोज ऑफ द डेव्हिल इक्वेडोरला नरीज डेल डियाब्लो नावाने ओळखले जाते. हा रेल्वेमार्ग समुद्रसपाटीपासून 9 हजार फुटांच्या उंचीवर आहे. हा रेल्वेमार्ग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा धोकादायक रेल्वेमार्ग मानला जातो, कारण या रेल्वेमार्गावर रेल्वे एका धोकादायक पर्वतातून प्रवास करत असते.
एसो मिनामी मार्ग, जपान
मिनामी-एसो मार्ग जपानमध्ये असून तो जगातील चौथ्या क्रमांकाचा धोकादायक रेल्वेमार्ग आहे. 2016 मध्ये कुमामाटोमध्ये आलेल्या एका भूकंपात रेल्वेमार्गाचा एक हिस्सा नुकसानग्रस्त झाला होता, तेव्हापासून याचा वापर कमी झाला आहे. परंतु जेव्हा एखादी रेल्वे यावरून जाते, तेव्हा त्यात बसलेल्या प्रवाशांची स्थिती खराब असते, कारण याच्या आसपास ज्वालामुखीची सक्रीयता असून हा रेल्वेमार्ग माउंट एसोमधून जातो.
व्हाइट पास आणि युकोन रेल्वेमार्ग, अलास्का
व्हाइट पास आणि युकोन मार्ग अलास्का ते व्हाइटहॉर्स, युकोन बंदराला जोडतो. यावरून प्रवास करण्यादरम्यान रेल्वे 3 हजार फुटांवरून जात असते. अशा स्थितीत या रेल्वेमार्गाला धोकादायक मानले जाते.