स्पर्श केल्यास होतात जीवघेण्या वेदना
जिम्पाई-जिम्पाईला जगातील सर्वात धोकादाक रोप संबोधिण्यात येते. हे रोप पाहण्यास अत्यंत साधारण वाटते, परंतु याला स्पर्श केल्यास याचा दंश तुम्हाला एकाचवेळी तप्त ऍसिडपासून वीजेच्या धक्क्याची जाणीव करून देते. हे रोप लोकांना तडफडवून आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याने याला ‘सुसाइट प्लांट’ देखील म्हटले जाते. अत्यंत धोकादायक असूनही ब्रिटनमध्ये एका इसमाने स्वतःच्या घरात या रोपाची लागवड केली आहे. स्वतःच्या जुन्या रोपांचा कंटाळा आल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे. त्याने हे रोप एका पिंजऱयात कैद केले असून त्यावर धोक्याचा इशारा नमूद केला आहे.
डॅनिएल एमलिन-जोन्सने जिम्पाई-जिम्पाईची अत्यंत सावधपणे लागवड करत असल्याचे सांगितले आहे. मी एका मूर्खाप्रमाणे दिसू इच्छित नाही, याचमुळे अत्यंत सुरक्षितपणे या रोपाची लागवड करत आहे. काही बॉटेनिकल गार्डन्समध्ये याची रोपं चकित करणाऱया नमुन्यांच्या स्वरुपात उपलब्ध असतात असे त्याचे म्हणणे आहे.
स्वतःच्या उद्यानात अन्य झाडांचा कंटाळा आल्याने जिम्पाई-जिम्पाईची लागवड करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले आहे. जिम्पाई-जिम्पाईला स्पर्श केल्यावर संबंधित व्यक्तीला मोठा त्रास होत असतो. एका व्यक्तीने या रोपाच्या स्पर्शानंतर झालेल्या वेदनेमुळे स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. या व्यक्तीने या रोपाच्या पानांचा वापर टॉयलेट पेपरच्या स्वरुपात केला होता.