काही खाद्यपदार्थांची चव ही न विसरता येणारी असते. काही खाद्यपदार्थ हे चवीला चांगले असले तरीही आरोग्यासाठी ते चांगले नसतात. अशाच प्रकारची एक अत्यंत धोकादायक डिश आहे. ही अजब डिश दक्षिण आशियातील आहे. हा खाद्यपदार्थ माणसाच्या यकृतावर अशाप्रकारचा प्रभाव पाडतो की त्याला मृत्युच्या दारातच नेऊन सोडतो. थायलंडमधील ही खास डिश खाणे अत्यंत जोखिमीचे आहे. लोक याची चव पसंत करतात, याचमुळे ती आवडीने खातात, परंतु यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची जोखीम वाढते.
थायलंडमध्ये मिळणाऱ्या या खाद्यपदार्थाचे सेवन करताच यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते. या खाद्यपदार्थाचा एक घास खाणे देखील कर्करोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे. केवळ याच डिशमुळे थायलंडमध्ये दरवर्षी 20 हजार लोक मृत्युमुखी पडत असतात. तरीही थायलंडच्या खोन काइन नावाच्या प्रांतात लोक या डिशला पसंती देतात आणि खातात देखील.
या खाद्यपदार्थाचे नाव कोइ प्ला आहे. याकरता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये माशाचे तुकडे वापरले जातात, जे हर्ब्स, स्पाइसेज आणि निंबूच्या रसाला मिळून स्वादिष्ट केले जातात. थायलंडमध्ये लाखो लोक या खाद्यपदार्थाला पसंत करतात. मासे लोकांना हानी पोहोचवित नाहीत, परंतु यातील परजीवी किडे डिशद्वारे लोकांच्या शरीरात पोहोचतात आणि खाणाऱ्याच्या जीवाचे शत्रू ठरतात. यमुळे बाइल डक्ट कॅन्सर यासारखा आजार होण्याची शक्यता वाढते, याचमुळे याला सर्वात धोकादायक डिश मानण्यात येते.









