क्षणार्धात घेऊ शकतो कुणाचाही जीव
प्रत्येकाला पक्षी आवडतात, पक्षी आकाशात उडताना पाहणे आणि त्यांचा आवाज ऐकणे मनाला मोहून टाकणार आहे. तसेही पक्षांच्या अनेक प्रजाती आहेत. प्रत्येक पक्षी एकप्रकारे वेगळाच असतो. कुठल्या पक्षाचा आवाज मधूर असतो, तर कुणाचा रंग नजरेत भरणारा असतो. तर काही पक्षी शांत तर काही हिंसक देखील असतात. परंतु एक असा पक्षी आहे, जो वेळ पडल्यास कुणाचाही जीव घेऊ शकतो. एखादा माणूस किंवा प्राण्यापासून स्वतःला धोका असल्याचे वाटल्यास हा पक्षी स्वरक्षणार्थ त्याच्यावर जीवघेणा हल्लाही करतो. या पक्ष्याला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात धोकादायक पक्षी असा मान मिळाला आहे.
या पक्षाचे नाव कॅसोवेरी असून त्याच्या पायाचे पंजे एखाद्या खंजीरापेक्षा कमी नसतात. या पक्षाच्या पायांच्या अंगठय़ामध्ये आतील बाजूला सुऱयासारखा एक पंजा असतो, जो कुठल्याही माणसाचे पोटही फाडू शकतो. हा पक्षी आक्रमक झाल्यावर तो थट स्वतःच्या पंज्यांनी हल्ला करून शत्रूला संपवून टाकू शकतो.

हा पक्षी ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आफ्रिकेच्या गिनी देशात आढळून येतो. या पक्ष्याच्या शरीरावर निळय़ा रंगाचे चट्टे असतात. मादा कॅसोवेरीचे सरासरी वजन 59 किलो तर नर कॅसोवेरीचे वजन 34 किलोग्रॅमपर्यंत असू शकते. हा पक्षी स्वतःच्या परिवारासोबत राहणे पसंत करतो. त्यांना पोहणे अत्यंत चांगल्याप्रकारे जमते आणि ते मासे खात असतात. पाण्यानजीक राहणे त्यांना पसंत असते.
त्यांचे डोळे अत्यंत धोकादायक असतात. त्यांना पाहिल्यावर ते कधीही हल्ला करू शकतात असे वाटते. त्यांच्या डोक्यावर एक तुरा असतो, जो पाहण्यास एखाद्या मुकुटासारखा वाटतो. हा केस्कूय त्यांच्या डोक्याल ईजा होण्यापासून वाचवितो. हा पक्षी हिंसक असूनही जुन्या काळात लोक त्याला मांस आणि पंखांसाठी पाळत होते. परंतु हा पक्षी स्वतःच्या अंडय़ांनजीक कुणालाच भटकू देत नाही.
अंडय़ांच्या रक्षणासाठी तो घरटय़ांमधून बाहेर पडत नाही. जोपर्यंत पिल्लं अंडय़ांमधून बाहेर पडत नाहीत, तोवर मादी पक्षी अन्नही ग्रहण करत नाही. सद्यकाळात कॅसोवेरी पक्ष्यांना पपाया न्यूगिनीमध्ये त्यांच्या पंखांसाठी पाळले जाते. त्यांच्या अंडय़ांना नॅशनल फूडचा दर्जा देखील मिळाला आहे.









