बसणाऱ्याला होतो मोठा त्रास
आजच्या काळात कुणीही भूत-पिशाच्चावर विश्वास ठेवत नाही, प्रत्येकाला अशा गोष्टी खोट्या वाटू लागतात. परंतु जगात एक अशी खूर्ची आहे, ज्याविषयी ती शापित असल्याचे बोलले जाते. या खूर्चीवर बसताच माणसाचे आकस्मिक निधन होत असल्याचे मानले जाते. जर तुम्हाला ही खूर्ची पहायची असेल तर ती पाहता येणार आहे.
या खूर्चीवर जो व्यक्ती बसतो, तो फारकाळ जगत नसल्याचे बोलले जाते. ब्रिटनमध्ये ही खूर्ची असून याला डेथ चेयर म्हटले जाते. या खूर्चीवर बसणारा इसम जिवंत राहत नसल्याची वदंता आहे. परंतु ही घटना आताची नसून 300 वर्षांपूर्वीची आहे, परंतु अद्याप याविषयीची कहाणी प्रचलित आहे.
ही खूर्ची कधीकाळी नॉर्थ यॉर्कशायरच्या थॉमस बस्बी यांच्याकडे होती. त्यांना या खूर्चीपासून कधीच धोका झाला नाही, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ही खूर्ची शापित झाली. ज्या कुणी या खूर्चीवर बसून आराम करण्याचा प्रयत्न केला, त्याला मृत्यूने कवटाळले आहे. खूर्चीचा मालक थॉमस बस्बी यावर आराम फर्माविणे अत्यंत पसंत करायचा. एकेदिवशी त्याचे सासरे या खूर्चीवर बसले, यामुळे थॉमस यांना राग आला आणि त्यांना सासऱ्याचा जीवच घेतला होता. यानंतर थॉमस यांच्या खटला चालला होता. याप्रकरणी थॉमस यांना 1704 मध्ये फासावर लटकविण्यात आले होते. मरण्यापूर्वी थॉमस बस्बी यांनी या खूर्चीवर जो कुणी बसेल तो फारकाळ जगणार नसल्याचा शाप दिला होता अशी वदंता आहे.
प्रारंभी लोकांनी थॉमसच्या बोलण्याला गांभीर्याने घेतले नाही. परंतु जे लोक या खूर्चीवर बसले ते मृत्यूमुखी पडले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काही सैनिक बस्बी यांच्या खूर्चीवर बसले होते, परंतु त्यातील कुणीच जिवंत वाचू शकले नाही. कारण काहीही असले तरीही खूर्चीवर बसण्याची ज्या कुणी चूक केली तो देवाघरी गेला आहे.
संग्रहालयात खूर्ची
या खूर्चीची जागा देखील बदलण्यात आली, परंतु शापाने स्वत:ची कमाल दाखविणे बंद केले नाही. अखेर ही खूर्ची एका स्थानिक संग्रहालयात ठेवण्यात आली. थ्रर्स्क म्युझियममध्ये ही खूर्ची खाली जमिनीवर ठेवण्याऐवजी छताला टांगून ठेवण्यात आली आहे. याचबरोबर खूर्ची शापित असल्याची कहाणीही तेथे नमूद करण्यात आली आहे.









